Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना शिंदे गटाची ( Shinde Group )आणि शिवसेना( Shivsena ) न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली होती.

- Advertisement -

उद्या 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र यात बदल करण्यात आला आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत नियोजित वेळापत्रकानुसार 22 ऑगस्ट रोजीच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते.

त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार नाही. उद्या ऐवजी सुनावणी २३ ऑगस्ट, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court)यादीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सुनावणीची शक्यता असे लिहण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या