Monday, April 29, 2024
Homeजळगावपालकमंत्र्यांसह ना. महाजनांना शिंगाडे दाखविण्याची वेळ

पालकमंत्र्यांसह ना. महाजनांना शिंगाडे दाखविण्याची वेळ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांची सध्या मोठी बिकट अवस्था झाली आहे. कापूस, कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कापसाच्या भावासाठी एकेकाळी आंदोलन करणार्‍या ना. गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित करून पालकमंत्र्यांसह ना. गिरीश महाजनांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आ. खडसे म्हणाले की, राज्य सरकारने 12 तास वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पण अजूनही विज शेतकर्‍याला मिळत नाही. खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. असे असतांना शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव नाही.

दहा वर्षापूर्वी ना. गिरीश महाजन यांनी कापसाला सात हजार रूपये भाव मिळावा म्हणून दहा दिवस उपोषण केले होते. मग आज कापसाला हमीभाव देण्यासंदर्भात ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील बोलायलाही तयार नाही अशी टीका त्यांनी केली. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय आणि मंत्री गिरीश महाजन हे विदेश दौरे करताय. जिल्ह्यातील या दोन्ही मंंत्र्यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचे डोके वठणीवर आणण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या