Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारोजगारपात्र तरुणांची वाढती संख्या चिंताजनक

रोजगारपात्र तरुणांची वाढती संख्या चिंताजनक

नाशिक । रवींद्र केडीया | Nashik

देशातील रोजगारक्षम जनता (Employable people) हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. देशाचे युवा नागरिक (Young citizen), लोकसंख्येतील विशिष्ट वयोगट याकडे जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताकडे (india) पाहिले जाते.

- Advertisement -

त्याचप्रमाणे उत्पादीत वस्तू व सेवांसाठी सर्वात मोठा ग्राहक (Customer) म्हणूनही भारताकडे पाहताना या विशिष्ट घटकाला काम देण्याची आज नितांत गरज आहे. तरुण किंवा रोजगारक्षम नागरिकांची संख्या (Number of young or employed citizens) वाढणे, जेवढी चांगली तेवढीच चिंतेची बाबही ठरू पहात आहे. रोजगारक्षम हातांना काम दिले नाही तर बेरोजगारांची (Unemployed) संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. या तरुणांना (Youth) विविध प्रकारचे रोजगार (Employment) उपलब्ध करून देणे, ही देशाची जबाबदारी ठरत आहे.

वास्तविक, इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगारक्षम तरुणांची देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) आवश्यकता आहे. मात्र हे रोजगारक्षम तरुण तयार होत असताना रोजगाराच्या संधी (Employment opportunities) उपलब्ध करुन देणे हे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी गुंतवणूक (Investment), सुधारणा आणि पायाभूत सुविधा (Improvements and infrastructure) या घटकांचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे. रोजगारक्षम नागरिकांची ही वाढती संख्या स्थायी आर्थिक विकासासाठी (Economic development) महत्वाची असली तरी त्यासाठीची तरतूद तितकीशी पुरेशी नसल्याने आर्थिक विकासाला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे.

नवी आव्हाने

आज ऑटो मशीनचा (Auto machine) जमाना आहे. कारखान्यांमध्ये कायम कामगारांची संख्या घटू लागली आहे. नवीन उद्योगांची उभारणी नगण्य आहे. अशा वातावरणात रोजगाराच्या नव्या संधी (New employment opportunities) शोधणे आव्हान ठरणार आहे. उद्योगांनी ऑटोमेशन (Automation) स्वीकारण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने उत्पादन वाढ होणे, निर्दोष उत्पादने तयार करणे, कमी जागेमध्ये उत्पादन घेणे,ते गुणवत्तापूर्ण असणे ही कारणे आहेत. ऑटोमेशनमुळे बाजाराच्या मागणीच्या प्रमाणात गतीने उत्पादन घेणे शक्य होते.

उद्योगांना प्रोत्साहन मिळावे

नाशिक विभागात आज 5 लाखांहून जास्त रोजगारक्षम बेरोजगारांची संख्या आहे. दिवसागणिक त्यात वाढच होत आहे. प्रत्येक हाताला काम मिळवणे कठीण होत असताना मोठ्या उद्योगाची आस न धरता मध्यम, लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाल्यास त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे.त्यासोबतच स्थानीक हस्तकला व्यवसाय, घरगुती उत्पादने, छोटे व्यवसाय, स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवनवीन उद्योग उभे राहणे व त्या माध्यमातून रोजगारक्षम बेरोजगारीला कार्यरत करणे शक्य होणार आहे.

10 वर्षात 10 कोटी रोजगारपात्र

सन 2020-30 या काळात रोजगारक्षम नागरिकांची संख्या देशात 10 कोटी होणार आहे. 2030-40 या दहा वर्षांत ही संख्येत 6 कोटीने वाढणार आहे.2040-50 या काळात रोजगारक्षम नागरिकांमध्ये 2 कोटींची भर पडणार आहे. तसे पाहता 2020 ते 50 दरम्यान देशात 18 ते 60 या वयोगटातील नागरिकांमध्ये 18 कोटींची भर पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या