ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती गंभीर

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती गंभीर

नाशिक | प्रतिनिधी

मराठी, हिंदी सिनेसृष्टी व रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती पसरली.विक्रम गोखले यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आल्याचे ही समजले.

दरम्यान काल रात्री अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती बाबतच्या चर्चेला उधाण आले. समाज माध्यमांवर अनेकांनी यांच्या निधनाचे ही वृत्त देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर काही समाज माध्यमांनी त्यांची प्रकृती गंभीर असून अफवा पसरवू नये अशा ही बातम्या दिल्या . मात्र अधिकृत रित्या त्यांच्या प्रकृती बाबत कुठलीही माहीत प्रसिद्ध झाली नाही.

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व केलं .त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या गोदावरी चत्रपटात विक्रम गोखले महत्वाच्या भूमिकेत दिसले.

विक्रम गोखले यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपटात ही आपली छाप पाडली. यात 'हम दिल दे चुके सनम' , 'अग्निपथ' मधील भूमिकांचा समावेश आहे. मराठी रंगभूमीवर देखील विक्रम गोखले यांनी आधिपत्य गाजवले. नटसम्राट या नाटका वरील चित्रपटात त्यांनी गणपत बेलवलकर यांची भूमिका निभावली.

अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले . त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com