'या' ग्रामपंचायतींचे निकाल झाले जाहीर

उपस्थितांमध्ये चढाओढ; जनतेमधून थेट सरपंच निवडीने उत्साह
'या' ग्रामपंचायतींचे निकाल झाले जाहीर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील कळवण (Kalwan), दिंडोरी (dindori) आणि नाशिक तालुक्यांतील (nashik taluka) ग्रामपंचायतीसाठी (gram panchayat) काल (दि. 18) रोजी मतदान (voting) झाले होते. सरासरी 82 टक्के एवढे मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज तीनही तालुक्यांच्या ठिकाणी पार पडली.

नाशिक तालुक्यातील एकूण सोळा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका (election) लागल्या होत्या. यावेळी जनतेमधून थेट सरपंच (sarpancha) निवडण्याची पद्धत पुन्हा सुरु करण्यात आली होती. त्यामुळे सरपंच आणि प्रभागातील इतर सदस्य अशी निवडणूक (election) झाली.

सोळा ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने सारूळ, धोंडेगाव, नाईकवाडी, वाडगाव, नागलवाडी, ओझरखेड, दुगाव, गोवर्धन, गंगावर्‍हे, वासाळी, गणेशगाव, राजेवाडी, दहेगाव, राजूर बहुला, इंदिरानगर आणि जातेगाव या ठिकाणी ही निवडणूक पार पडली होती. आज मतमोजणी (vote counting) दरम्यान आपल्या गावचे कारभारी ठरले म्हणत गावकर्‍यांनी निःश्वास सोडला.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election) यंदा सरपंच पदासाठी थेट जनतेमधून निवडण्यात येणार होते. त्यानुसार या निवडणुकीत अतिशय चुरस बघावयास मिळाली. तालुक्यात दहेगाव या ठिकाणी बिनविरोध लढत बघायला मिळाली. त्यामुळे उर्वरित 16 ग्रामपंचायत निकालासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ बघायला मिळाली. नाशिक तालुक्यातील ओझरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबुराव सीताराम दिवे (849 मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हिरामण बाबुराव दोबाडे (460 मते) यांचा 389 मतांनी पराभव केला आहे.

सारूळ ग्रामपंचायतीच्या सरळसरळ झालेल्या दुरंगी लढतीत सरपंचपदी मोहन लक्ष्मण डगले (442 मते) यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी चंद्रभान दगडू पोटींडे (393 मते) यांचा 49 मतांनी पराभव केला आहे. राजेवाडीमध्ये रेणुका टोपले (256 मते) यांनी सुनिता खोडे (210 मते) यांचा पराभव करत सरपंच पदावर मोहोर उमटवली. वासाळी ग्रामपंचायतीच्या दुरंगी लढतीत आशा उत्तम खेटरे (388 मते) या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी रेणुका लक्षमण डहाळे (291 मते) यांचा 97 मतांनी पराभव झाला आहे.

राजूरबहुला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा गुलाब ससाणे (508 मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी सुशीलाबाई मधु धुमाळ (336 मते) यांचा 172 मतांनी पराभव केला आहे. गणेशगाव ग्रामपंचायतमध्ये रुपाली ठमके (449 मते) यांनी जया लीलके (353 मते) यांचा पराभव केला आहे. नागलवाडी ग्रामपंचायतमध्ये रुपचंद पोटीदे (257 मते) यांनी छगन लीलके (179 मते) यांचा पराभव केला आहे. गंगावर्‍हे ग्रामपंचायतमध्ये लक्ष्मण बेंडकुळे (452 मते) यांनी जयराम गोतारणे (439 मते) यांचा पराभव केला आहे.

दुगाव ग्रामपंचायतमध्ये ज्ञानेश्वर गवे (477 मते) यांनी मुरलीधर पावडे (358 मते) यांचा पराभव केला आहे. धोंडेगाव ग्रामपंचायतमध्ये प्रवीण बेंडकोळी (779 मते) यांनी जगदिश बेंडकोळी (461 मते) यांचा पराभव केला आहे. नाईकवाडी ग्रामपंचायतमध्ये भारताबाई बदादे (570 मते) यांनी जिजा निपलुंगे (198 मते) यांचा पराभव केला आहे. जातेगाव ग्रामपंचायतमध्ये सरला निंबेकर (484 मते) यांनी सोनिया जावळे (116 मते) यांचा पराभव केला आहे. इंदिरानगर ग्रामपंचायतमध्ये चांगुना बेंडकोळी (488 मते) यांनी माया बेंडकोळी (345 मते) यांचा पराभव केला आहे.

वाडगाव ग्रामपंचायतमध्ये नंदाबाई चहाळे (452 मते) यांनी जयराम गोतारणे (439 मते) यांचा पराभव केला आहे तर गोवर्धन ग्रामपंचायत मध्ये गोविंद डंबाळे (1371 मते) यांनी बापू डंबाळे (377 मते) यांचा पराभव केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तहसील कार्यालयात सकाळपासून मतमोजणी सुरु झाली. जसजसे निकाल हाती येत होते तसतसे विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी तिथेच गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

ग्रामपंचायत व विजयी उमेदवार

ओझरखेड : बाबुराव दिवे., गोवर्धन : दत्तु डंबाळे, शोभा डंबाळे, मंदा वायचाळे, गोविंद बेंडकुळे, वैशाली जाधव, गोविंद डंबाळे, लंकाबाई बदादे, सुरज ढवळे, माया जाधव, विमल राऊत, ज्ञानेश्वर गाडे, बाळासाहेब लांबे, रत्ना मधे., गणेशगाव -गोकुळ ठमके, ज्ञानेश्वर ठमके, रुपाली ठमके, इंदिरानगर- चांगुना बेंडकोळी, वासाळी- नितीन खेटरे, आशा खेटरे, नाईकवाडी- लालू गायकवाड, बबिता बेंडकोळी, भारताबाई बदादे, मिराबाई गुंबाडे, पुंडलिक निपळुंगे, फुलाबाई शिरोळे, जातेगाव- प्रतिक्षा नेटावटे, दशरथ ससाणे, नागेश कांडेकर, भारती सदगीर, सरला निंबेकर,

नागलवाडी- पुंजा मराडे, भिकाजी मराडे, रुपचंद पोटिंदे, ओझरखेड - बाबुराव दिवे, राजेवाडी-रेणुका टोपले, हौसाबाई टोपले, यमुनाबाई खोडे, सीमा खोडे, धनाजी टोपले, सोनु गोहिरे, दुगाव - सिताराम गायकवाड, कमलाबाई घोडे, सागर गवे, प्रिती वाघ, हरी धोंडगे, पुष्पा जाधव, ठकुबाई थेरे, ज्ञानेश्वर गवे, धोंडेगाव- अर्जुन बेंडकोळी, तुळशीदास बेंडकोळी, लताबाई मोरे, बाळू बेंडकोळी, ताराबाई दोबाडे, योगिता बेंडकोळी, प्रविण बेंडकोळी,

सारूळ- मोहन डगळे, एकनाथ ससाणे, वर्षा तांबडे, गायत्री नवले, सदानंद नवले, इंद्राबाई भोईर, बिजल नवले, आकाश मुंजे, गोविंद वागळे, सोनाली भोईर, गंगावर्‍हे- संजय गोतरणे, नितीन धोंगडे, प्रकाश धोंगडे, अंजना बेंडकोळी, रुंजा धोंगडे, अर्चना दोंदे, रोहीणी गडरे, लक्ष्मण बेंडकुळे, दहेगाव- शरद कडलग, इंदुबाई बिन्नर, संतोष राहाडे, यशोदा बिन्नर, वाडगाव - वनिता निंबेकर, रोहिणी निंबेकर, महेश कसबे, अलका कसबे, दत्तू लहांगे, विलास कसबे, गोरख करवंदे, स्वाती करवंदे, सुवर्णा कसबे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com