युट्युबच्या साथीने बहरेतय शिक्षकांची उपक्रमशीलता

युट्युबच्या साथीने बहरेतय शिक्षकांची उपक्रमशीलता

नाशिक | सारिका पूरकर-गुजराथी | Nashik

शहराबरोबरच ग्रामीण भागातील शिक्षकही आता टेक्नोसॅव्ही झाले असून युटयुब या माध्यमाचा अत्यंत कुशलतेने, सकारात्मक रित्या, क्रिएटिव्ह पद्धतीने वापर ते करताहेत. यु ट्युबच्या सहाय्याने शिक्षण गंमती-जंमतीचे करण्यावर या शिक्षकांचा भर दिसून येत आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यादृष्टीने यु ट्युबच्या साथीने सुरु असलेले अत्यंत कौतुकास्पद आहेत.

राष्ट्रीय शिक्षक दिनाानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात नाशिक जिल्हयातील पाच शिक्षकांचा समावेश आहे. या पाचही शिक्षकांनी यु ट्युबशी मैत्री, शिक्षणाशी गट्टी हा मंत्रा फॉलो केला आहे. या माध्यमाची ताकद ओळखून या शिक्षकांनी अधिकाधिक नवनवीन संकल्पना या माध्यमाच्या सहाय्याने हाताळल्या आहेत. या शिक्षकांच्या यु ट्युब चॅनल्सला नाविन्य व सहजसुलभतेची जोड लाभली आहे. त्यातही महिला शिक्षकांची आघाडी यु ट्युबवरही पाहायला मिळते. कल्पक उपक्रम व व्हिडिओ निर्मितीमध्ये महिला शिक्षक आघाडीवर आहेत.

युट्युबच्या साथीने बहरेतय शिक्षकांची उपक्रमशीलता
Sharad Pawar : “नऊ वर्षांत मोदींनी फक्त..."; शरद पवारांचा घणाघात

कुंदाताईंचे माय आयडी माय क्यू आर कोड
कुंदा बच्छाव या नाशिकमधील आनंदवली येथील महापालिका शाळा क्रमांक १८ मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या यु ट्युब चॅनलवर १३७ व्हिडिओज उपलब्ध असून ८३४ सबस्क्रायबर्स आहेत. कुंदाज टिचिंग आयडियाज या नावाने त्या हे चॅनल चालवितात. आनंदवलीसारख्या ग्रामीण बहुल भागातील मुलं तंत्रज्ञानापासून वंचित राहू नयेत म्हणून माय आयडी माय क्यू आर कोड हा अत्यंत कल्पक उपक्रम, पायलट प्रोजेक्ट राबवला. यु ट्युबवर अकाऊंट कसे उघडावे, पॉवर पाईंट अशा अनेक बाबी त्यांनी मुलांना शिकवल्या. तसेच वर्गात मुलांनी केलेला अभ्यास व घरी दिलेला अभ्यास यांची छायाचित्रे व व्हिडिओजच्या माध्यमातून डिजिटली त्या स्टोअर करु लागल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला क्यू आर कोड बनवून देण्यात आला व क्यु आर आयडी कार्डही बनवून देण्यात आले. मुलांना एखादी कविता पाठ करायला सांगितली असेल तर त्यांनी ती व्हिडिओ स्वरुपात स्वत:च्या अकाऊंटवर अपलोड करायची.

अभ्यास करतानाची काही छायाचित्रे अपलोड करायची. जेणेकरुन प्रत्येक विद्यार्थ्याचा क्यु आर कोड स्कॅन करुन शिक्षक व पालक हा अभ्यास केव्हाही तपासून पाहू शकतील. असा हा पायलट प्रोजेक्ट कुंदाताईंनी राबवला. त्याचबरोबर प्रौढसाक्षरता, व्यसनमुक्त गाव, कोरोना काळात अधिकारी आपल्या भेटीला, पुस्तके आपल्या भेटीला, संगीतमय पाढे, चांगल्या आणि वाईट सवयींचा सापशिडी खेळ, मुलांनी तयार केलेल्या पाककृती,शारिरीक शिक्षणातील सहजसोपे खेळ, लघुनाटिका या अशा अनेक कल्पक उपक्रमांचे व्हिडिओज या चॅनलवर आहेत. यातून कुंदाताईंचे शिक्षणातील प्रयोग ठळकपणे समोर येतात.


नलिनीताईंचे बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षण
नलिनीताई अहिरे या निफाड तालुक्यातील दीक्षी गावातील बाणगंगानगर जि.प.शाळेत कार्यरत आहेत. नलिनीताईंच्या यु ट्युब चॅनलच े४७५ सबस्क्रायबर्स आहेत व त्यांच्या चॅनलवर एकूण १२३ व्हिडिओ आपल्याला आढळतात. गणित, भाषा या विषयातील काही संकल्पना सोप्या रितीने मुलांना समजाव्या यासाठी नलिनीताईंनीही कल्पक उपक्रम शाळेत राबवले आहेत.

बोलक्या बाहुल्या, जोडीला सोपे संवाद या माध्यमावर नलिनीताईंनी भर दिला आहे. बोलक्या बाहुल्यांद्वारेच व्यसनमुक्ती, वृक्षरोपण, स्वच्छतेचा संदेश, जुनी पेन्शनयोजना, माझी दिनचर्या, खेळातून गणित (आदर्श पाठ)  या संकल्पना तसेच महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, शहीद भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण मुलांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील काही महत्वाचे प्रसंग नलिनीताईंनी बोलक्या बाहुल्यांद्वारे सादर केले आहेत.  शब्दकोडी, शब्दांची माळ अशा रंजकपद्धतीने शिक्षण मजेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

युट्युबच्या साथीने बहरेतय शिक्षकांची उपक्रमशीलता
Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ...; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त


माधुरीताईंच्या सहजसोप्या संकल्पना
माधुरीताई या इगतपुरी तालुक्यातील मोडोळे जि.प.शाळेत कार्यरत आहेत. माधुरीताईंच्या यु ट्युब चॅनलचे ७९७ सबस्क्रायबर्स आहेत. तसेच २३७ व्हिडिओज त्यांच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. संस्कार मोती या नावाने ते हेे चॅनल चालवतात. बोधपर कथा, पदार्थ व चव, स्वर व व्यंजन, शब्द वाचन, मामान्य ज्ञान, मराठी महिने व सण, अक्षराची ओळख व लेखन, गणितातील संज्ञा अशा विषयांवरील नलिनीताईंनी विकसित केलेल्या सहजसोप्या संकल्पना या चॅनलवर आपल्याला दिसतात. सुंदर व आकर्षक चित्रांची जोड देत त्यांनी या संकल्पना हाताळल्या आहेत.  जोडीला कलाकुसर, खेळ यातील मुलांचा सहभागही नलिनीताईंनी दर्शविला आहे.

दरम्यान दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी जि.प.शाळेतील विलास जमदाडे यांच्या यु ट्युब चॅनलवरही ४५ व्हिडिओज उपलब्ध असून ३२० सबस्क्रायबर्स आहेत. चित्रातून गणित, चक्राच्या सहाय्याने गणित वाचन, आमची शाळा, वक्तृत्व स्पर्धा, अंक व अक्षर जुळवणी यासंदर्भातील त्यांनी साकारलेल्या संकल्पना या चॅनलमधून दिसतात. चांदवड तालुक्यातील सोग्रस जि.प.शाळेतील शिक्षक रावसाहेब जाधव यांच्या यु टयुब चॅनलवर १९६ व्हिडिओज उपलब्ध आहेत. जाधव यांनीतंबाखूमुक्त शाळा, बालकवी संमेलन, शालेय निवडणूक, परीक्षा लघुपट मराठी व्याकरण या विषयांना प्राधान्य दिले आहे.

युट्युबच्या साथीने बहरेतय शिक्षकांची उपक्रमशीलता
World Cup मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर इंडियाऐवजी ‘हे’ नाव असावं; वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com