Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यागिरणा धरण भरले; पाण्याचा विसर्ग सुरु

गिरणा धरण भरले; पाण्याचा विसर्ग सुरु

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

उत्तर महाराष्ट्रातील(North Maharashtra) सर्वाधिक साठवण क्षमता असलेले आणि नांदगाव, मालेगांव तालुक्यांसह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणारे गिरणा धरण ( Girna Dam )आज (दि. २ ) सायंकाळी  ९७.७२ टक्के भरले आहे.

- Advertisement -

सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाची दोन वक्रद्वारे दोन फूट तर चार वक्रद्वारे एक फूट उघडण्यात आली असून गिरणा नदीपात्रात ९७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग ( Discharge of Water From Girna Dam)करण्यात येत आहे. धरणातील • पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाच प्रमाण कमी-अधिक केले जाईल. त्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने गिरणा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने सगळीकडेपावसाचे आगमन झाले आहे.गिरणा धरणातून पूरपाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गिरणा धरण शंभर टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज (दि.२) सायंकाळी ६:००वाजता धरणात९७:७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण सुरक्षितततेच्या दृष्टीने वरून येणारे जास्तीचे पूरपाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

गिरणा धरणाचे दोन दरवाजे दोन फूट तर चार क्रमांकाचे वक्रदरवाजे एक फुटाने उघडण्यात आले असून सध्या नदीपात्रात ९७७६ (२७६.८२) क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याची आवक बघता विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच गुरेढोरे नदीजवळ नेऊ नयेत तसेच गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० द.ल.घ.फूट असून ९७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सुरू झाला असून धरणातील पाणी आवकेनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याचे आवाहन गिरणा पाटबंधारे विभाग व जळगाव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या