Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगांना मिळणार गती

जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगांना मिळणार गती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने (pm micro food processing scheme ) ‘ अंतर्गत जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगांना ( fruit processing industries ) गती देण्यासाठी कृषी समुह गटांसाठी फळ प्रक्रिया उद्योग उभारणी करीता सहकार्य केले जाणार आहे.

- Advertisement -

केंद्राची ‘ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ‘ सन 2021-22 ते 2024-25 अशी पाच वर्षे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगांना गती देण्यासाठी या योजनेची चांगली मदत होणार आहे.योजना असंघटित क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जाणार आहे. वैयक्तिक लाभार्थी बचत गट शेतकरी कंपनी यांना याचा लाभ घेता येणार आहे.

कृषी विभागामार्फत ‘ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ‘ देशभर राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कांदा, टोमॅटो,मका,सोयाबीन या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.या पिकांसाठी प्रक्रिया उद्योग करण्याकरिता केंद्र शासनाच्यावतीने एक लाखांपासून एक कोटीपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ एक जिल्हा एक उत्पादन ‘ या तत्त्वावर केंद्र शासन पुरस्कृत ही योजना आहे.या योजनेमध्ये सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातील एकवीस हजार 998 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्याकरिता सहाय्य करण्यात येणार आहे. हे देखील या योजनेमागील उद्दिष्ट आहे. त्यानुसार त्या दृष्टीने कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न केले जाणार आहे. उत्पादनाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान या योजनेमध्ये दिले जाणार आहे

कांदा,टोमॅटो,सोयाबीन,मकाचा समावेश

‘ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ‘ मध्ये कांदा- फ्राईड कांदा,पेस्ट, पावडर,ऑईल लोणचे इत्यादी. टोमॅटो- केचअप,जाम, प्युरी,सॉस,कॅन, टोमॅटो चटणी,सूप,जूस,लोणचे याचा समावेश आहे. दुग्ध व दुग्धजन्य – यामध्ये बासुंदी, पनीर, लोणी, चीज, आइस्क्रीम,तूप ,लस्सी ,श्रीखंड, ताक ,पेये, विप क्रीम,फॅट मिल्क,दही , दूध पावडर , प्रोटीन ,खवा, मावा, छन्ना संदेश,पेढा ,कलाकंद, कुल्फी ,रबडी ,बर्फी ,चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई ,रसगुल्ला इत्यादींचा समावेश आहे.

मका – कॉर्न सिरप,पीठ ,ऑइल स्टार्च, पॉपकॉर्न, आदींचा समावेश आहे. सोयाबीन – तेल,टोफु, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क,सोया प्रोटीन, सोया सॉस , सोया स्टिक, सोया चिप्स,पीठ आदी विविध प्रक्रिया उद्योगांना या योजनेमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

‘ एक जिल्हा एक उत्पादन ‘

‘ एक जिल्हा एक उत्पादन ‘ धोरणानुसार जिल्हा स्तरावर व वैयक्तिक उद्योजक आणि विविध गटांचे सदस्य, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी,उत्पादक संघ, कंपनी, संस्था आणि सहकारी उत्पादकांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे,असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या