Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या गुलाबाचा देशभर सुगंध

नाशिकच्या गुलाबाचा देशभर सुगंध

नाशिक । रवींद्र केडीया Nashik

गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराने आजही हा वसा कायम ठेवला असून जिल्ह्यातून देशभरात दररोज दोन लाख गुलाबपुष्प विक्रीसाठी पाठवून आपले वेगळेपण जपले आहे. नाशिकचे शहरीकरण झाले असले तरी आजही नाशिक शहर गुलशनाबाद म्हणून आपल्या बिरूदाला टिकून असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी, जानोरी व काही अंशाने कसबे सुकणे या परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.खुल्या शेतात मुख्यतः बोर्डे या जातीच्या गुलाबाची लागवड केली जाते. विविध प्रकारच्या व रंगांंच्या गुलाब फुले लागवडीचाही खुल्या शेतात प्रयत्न केला जातो.सुमारे 200 एकराच्या मोकळ्या शेतात गुलाब शेती आकार घेत आहे. या व्यतिरिक्त पॉलीहाऊसमध्ये मुख्यत: विविध रंगांचे फुलांचे उत्पादन घेतले जाते. त्यात प्रामुख्याने लाल रंगाच्या गुलाब (टॉप सिक्रेट), पिवळ्या रंगाचा (सोलर), सफेद रंगाचा (अविरॉय) या फुलांची सुमारे 100 एकर जागेच्या पॉलीहाऊसमध्ये लागवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त परिसरातून सर्वात जास्त लागवड शेवंती या फुलांची केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यासोबतच जसबेराची बागही मोठ्या प्रमाणात आहे. या फुलांमध्ये विशिष्ट सण उत्सवांच्या निमित्ताने खुल्या शेतांमध्ये तुकडा शेवंती, झेंडू,गेंदा ही सीजनल उत्पादने घेतली जात आहेत. फुलांसाठी प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, इंदोर, बडोदा या शहरांच्या मोठ्या बाजारपेठा निश्चित झालेल्या असून,यासोबतच अहमदाबाद, जयपूर, औरंगाबाद, पुणे या शहरांमध्येही फुलांना मोठी मागणी आहे. मोगरा उत्पादन हे अत्यल्प असून दहा गुंठे ते अर्धा एकर पर्यंत त्याचे उत्पादन घेतले जाते. मोठे शेतकरी केवळ फुलबागांंवरच अवलंबून राहत नसून, पेरू बागा, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो ही जोड उत्पादने ही ते घेतात.

गारांचा धोका

अवकाळी पावसाचा फुलबागांवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, गारपिट झाली तर फुल आणि काडी दोघांनाही मार बसत असल्याने उत्पादनावर विपरित परिणाम होत असतो.गेल्या काही वर्षांमध्ये डावणी, रेड माइट, भुरी, थ्रिप्स यासारख्यां रोगांचा फुल उत्पादनांवर विपरित परिणाम होत आहे.मात्र त्यातूनही या रोगांवर मात करून शेतकर्‍यांनी फुल उत्पादनांचा आपला वसा कायम ठेवलेला आहे.

हर्षल आबाजी काठे, उपसरपंच जानोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या