मनपात दरवळणार फूलांचा सूगंध

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागिल दोन वर्षाच्या अंतराला नंत या वर्षी पून्हा एकदा राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) प्रांगणात गूलाब (rose) फूलांसह विविध फूलांचा दरवळ घुमणार असून,

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वृक्ष प्राधिकरण समितीच्यावतीने दि .24 ते 26 मार्च दरम्याने तीन दिवसांचे ‘पुष्पोत्सव 2023’ (Pushpotsav 2023) या पूष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे (Vijayakumar Munde, Deputy Commissioner of Parks Department) यांनी केले आहे. या पूष्पोत्सव प्रदर्शनात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनी एचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला इ.चे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात येणार असल्याचे आहे.

यात एकुण 57 गट आहेत. प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आली असून महत्वाची बक्षिसे नामांकित कारखानदार, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समुह यांच्याद्वारे पूरस्कृत करण्यात येणार आहेत. पूष्पोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि.24) उदघाटन समारंभ व व स्मृती चिन्ह वितरण करण्यात येेणार असून त्यानंतर तसेच दि.25 व दि.26 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे पुष्पप्रदर्शन नागरिकांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध स्टॉल्स (Stalls) उभारले जाणार आहे. त्यासाठी पुष्पमहोत्सवाच्या (Pushpamahotsav) प्रांगणात नर्सरीचालक तसेच बाग - बगीचा साहित्याशी संबंधीत व्यावसायीकांसाठी त्यांचे साहीवरा मांडण्याची संंधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. स्टॉल्सची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी मपा मुख्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमी नागरिकांनी, शालेय विद्यार्थी (students) मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा . तसेच या प्रदर्शनाला भेट देवून या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com