भाजपच्या संकटमोचनांबाबत राष्ट्रवादीच्या माजी खासदारांनी व्यक्त केली ही शुभवार्ता.... म्हणाले पुढेही निवडूण येणार कारण मी आहे त्यांच्या पाठिशी...

भाजपच्या संकटमोचनांबाबत राष्ट्रवादीच्या माजी खासदारांनी व्यक्त केली ही शुभवार्ता.... म्हणाले पुढेही निवडूण येणार  कारण मी आहे त्यांच्या पाठिशी...

जामनेर Jamner। प्रतिनिधी -

माझा आशीर्वाद गिरीश महाजन (Girish Mahajan) सोबत असून तालुक्याची प्रगती गिरीश महाजनां मुळेच झाली. तालुक्यात त्यांचे काम आहे जो काम करतो मी त्याच्या पाठीशी आहे म्हणून गिरीश महाजन हे पुन्हा निवडून येतील (Will be re-elected) असे महत्त्वपूर्ण भाकीत राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन (NCP leader former MP Ishwar Babuji Jain) यांनी जामनेर मध्ये एका कार्यक्रमात बोलताना केले.

ईश्वर लाल जैन पतसंस्थेचे चेअरमन कचरू शेठ बोहरा यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी खासदार ईश्वर बाबूजी व्यासपीठावरून बोलताना पुढे म्हणाले की मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी जामनेर तालुका सोडून. जामनेर तालुक्यात माझा आशीर्वाद गिरीश महाजन यांना असून गिरीशने माझा नेहमीच मान सन्मान करून आदर केला आहे. गिरीश माझा मानसपुत्र आहे. मात्र माझ्या प्रॉपर्टीत त्याचा हिस्सा राहणार नाही असेही ईश्वर बाबूजी यांनी त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या साधना महाजन यांच्याकडे पाहून गमतीने म्हटले.

जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांचे चांगले काम आहे. तालुक्याची प्रगती त्यांच्यामुळेच झाली. आज जामनेर तालुक्यात 90 टक्के इरिगेशनचे काम पूर्ण झाले असून शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारली आहे. जो माझ्या तालुक्याचं भलं करेल त्याच्या मागे मी सदैव उभा राहील असेही ते म्हणाले. सत्कारमूर्ती कचरू शेठ बोहरा यांच्या भरीव व उत्कृष्ट कार्याचाही त्यांनी गौरव केला. या कार्यक्रमात नगराध्यक्षं साधनाताई महाजन, माजी नगराध्यक्ष राजू शेठ बोरा यांच्यासह प्रतिष्ठित व्यापारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com