पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते होणार आज ध्वजारोहण

पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते होणार आज ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या(Republic Day of India ) 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ( flag-hoisting) राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे (Nashik District Guardian Minister Dada Bhuse )यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२६) सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणीही सोबत बॅग आणू नये. तसेच नागरिक व शासकीय अधिकारी यांनी राष्ट्रीय पोषाखात तर गणवेशधारी अधिकारी यांनी नियमानुसार पोषाखात कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी.( Collector Gangatharan D)यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com