Photo Gallery : दातलीत रंगला पहिला रिंगण सोहळा

संत श्री निवृत्तीमहाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक
Photo Gallery : दातलीत रंगला पहिला रिंगण सोहळा

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यातील ( Sinnar Taluka ) दातली( Datli) येथे आज दि. 17 जून रोजी सायंकाळी वारकऱ्यांच्या पहिल्या रिंगण सोहळ्याचे ( Ringan Sohala )आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याभरातून हजारो भाविकांनी सोहळ्याला हजेरी लावत श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या ( Shri Sant Nivruttinath Maharaj)पालखीचे दर्शन घेतले.

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर ( Trimbakeshwar To Pandharpur Wari )येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका पांडुरंगाला भेटण्यासाठी मार्गक्रमण करत असताना ही पालखी गुरुवारी (दि.16) सिन्नर तालु्नयात दाखल झाली. पास्तेच्या अवगड घाट चढून पालखी सायंकाळी लोणारवाडी येथे पोहचली होती. गावातील भैरवानाथ मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पालखीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी गावाला मोठ्या यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यानंतर आज (दि.17) सकाळी पालखीचे सिन्नरकडे प्रस्थान झाले.

शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिराजवळ दिंडीचे लोकप्रतिनिधी व भाविकांच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यानंतर पालकीचे दुपारी दातलीकडे प्रस्थान झाले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे मुख्य प्रशासक अधिकारी ॲड.भाऊसाहेब गंभीरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दातली येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सिन्नर एमायडिसी पोलीस स्टेशनकडूनही यावेळी चोख व्यवस्था करण्यात आली होती. ग्रुपग्रामपंचायत दातली व समस्त ग्रामस्थ सर्वांच्या मदतीने रिंगण सोहळ्यासाठी 3 एकर मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता करण्यात आले होते.

तसेच पादुका मंदिर सुशोभित करून सज्ज ठेवण्यात आले होते. वारकरी संप्रदायातील भ डॉ. राम कृष्णदास महाराज लहवितकर, सुदाम महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, किशोर महाराज खरात, भगीरथ महाराज काळे, योगेश महाराज आव्हाड, जालिंदर महाराज दराडे व तालुक्यातील सर्व वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या मार्गदर्शनातून दातली ग्रामस्थांनी हा विशेष सोहळा पार पाडण्यासाठी कंबर कसली. रिंगण सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी अनेक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com