Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापालकमंत्री भुजबळ घेणार नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बैठक

पालकमंत्री भुजबळ घेणार नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाकाळात (Corona) आढावा बैठक दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जात होती. गेल्या अनेक दिवसांनंतर उद्या (दि १८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Gangatharan D) यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे…

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (MUHS) वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) मंजूर होऊन एक वर्षांचा कालावधी लोटला आहे. याबाबत महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार आहे. याप्रसंगी कुलसचिव कालिदास चव्हाण (Kalidas Chavhan) यांच्यासह अधिकारी वर्ग या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बैठकीला नूतन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उपस्थित राहणार आहेत.

याच वेळी लासलगाव बाह्य वळण रस्ता भूसंपादनावर अंमल केला जाणार आहे. तसेच जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित मुद्द्यांवरदेखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.

करोनाची रुग्णसंख्या पहिल्यांदाच दहा रुग्णांपेक्षा कमी झाली असल्यामुळे करोनाचे जिल्ह्यातील निर्बंध कमी होतील की नाही याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता या बैठकीत आहे. दुसरीकडे, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी शासनाला पत्र लिहून नाशिकमधील करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे निर्बंध शिथिल करावेत अशी विनंती केली आहे. त्यामुळे यावरदेखील या बैठकीत महत्वाची निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या