प्रदेशाध्यक्षांसमोर उफाळली राष्ट्रवादीतील गटबाजी

जिल्हा ग्रामीण तालुकाध्यक्षांची बैठक
प्रदेशाध्यक्षांसमोर उफाळली राष्ट्रवादीतील गटबाजी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पक्षात मानसन्मान (Respect in the party) मिळत नसून तालुकाध्यक्षांकडून (head of the taluka) बैठकांना (meetings) बोलाविले जात (Not called) नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन (Grievance NCP's Dnyaneshwar Mahajan) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) यांच्याकडे केली. महाजन यांच्याकडून तक्रारींचा पाढाच वाचला जात असल्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर (Former Minister Gulabrao Deokar) यांनी मध्येच आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रदेशाध्यक्षांना थेट मी विधानसभा (fight the assembly) लढवायची की नाही तसे मला सांगून टाका असे म्हटले. यावरुन प्रदेशाध्यक्षांसमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत गटबाजी पुन्हा (Internal factionalism erupted again) उफाळून आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर होते. त्यांनी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात ग्रामीण तालुकाअध्यक्षांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी तालुकाध्यक्ष धरणगावला बैठक घेतली जात नाही. तसेच बैठक जळगावला घेण्यास सांगितल्याचे सांगत बैठकीला बोलाविले जात नाही.

तसेच विधानसभा होवून तीन वर्षे झाले परंतु एकही बैठक झालेली नाही. तसेच विधानसभेला आम्ही नऊ जण ईच्छुक होते परंतु तरी देखील पक्षात आम्हाला सावत्र वागणुक दिली जात असल्याची तक्रार महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. यावर धरणगावचे तालुकाध्यक्ष धनराज माळी म्हणाले की, बहुतांश बैठका धरणगावलाच होतात त्या बैठकांना नेत्यांना देखील बोलाविले जात असल्याचा खुलासा केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष यांनी काही बैठका धरणगावला घेवून त्यांना सर्व नऊ इच्छुकांना बोलावण्याची सूचना यावेळी केली.

सांगून टाका उमेदवारी करायची की नाही - देवकर

महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारींचा पाढाच वाचल्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर म्हणाले की, माझ्याकडू सर्व ईच्छुकांना सन्मान दिला जातो. महाजनांनी स्वत: तालुक्यात फिरायला पाहिजे. पक्षाचे काम करायचे असेल तर एकदाच सांगून टाका, कुणी उमेदवारी करायची आम्ही त्याच्या नेतृत्वात काम करु. तक्रारी करुन आडकाठी केली जात आहे. तसेच मला सांगून टाका विधानसभा लढवयची की नाही असा सवाल देवकरांनी थेट प्रदेशाध्यक्षांना केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com