
नाशिक । प्रतिनिधी Nashik
युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे 'नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो'च्या ( New Nashik Property Expo)दुसर्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नवीन नाशिक आणि परिसरातील नागरिकांनी वीकएण्ड चा पुरेपूर आनंद घेतला.
दै.‘देशदूत’ आयोजित तसेच ललित रुंगटा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सङ्घ प्रायोजित 'नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो -2023' मध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत.
दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. नवीन नाशिक परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष साईट व्हिजिटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
साई संस्कृती पैठणी व मलबार गोल्ड अँड डायमंडस् गिफ्ट पार्टनर, पपायाज् नर्सरी पर्यावरण पार्टनर तर स्पायडर मीडिया हाऊस हे प्रदर्शनाचे इव्हेंट पार्टनर आहेत. आज रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लकी ड्रॉ विजेते
शुक्रवार
अक्षर अनंतचे संचालक अश्विन बोकारवाडिया, राजश्री प्रॉपर्टीचे अमोल शेंडे, मालपाणी गृहनिर्माणचे राहुल मालपाणी यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यु.के. नायर, अशोक जुन्नरे, विठोबा कांबळे या विजेत्यांना साई संस्कृती पैठणी तर्फे सेमी पैठण्या व भक्ती नलारे, राजेंद्र तांबे, चंदुलाल पाटील यांना मलबार गोल्ड आणि डायमंडस् तर्फे चांदीची नाणी देण्यात आली.
शनिवार
हरी ओम ग्रुप चे आशिष पुरवार, भाविक ग्रुपचे मनोज शहा, व्ही क्यूब चे जयदीप पाटील यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. सुधाकर कुलकर्णी, ममता कानसलिया, भूषण पवार या विजेतांना सेमी पैठणी देण्यात आल्या. अनिल अघोरे, अभिषेक भावसार, संदीप पाटील या विजेत्यांना चांदीचे नाणे देण्यात आले.
विजेत्यांनी एक्स्पोला भेट देऊन आपापली बक्षिसे घेऊन जावी. येताना सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.