Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी करणार मोठी गुंतवणूक

राज्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी करणार मोठी गुंतवणूक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

कॉसिस’ ई मोबिलिटी कंपनी Causis E- Mobility Company २ हजार ८२३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून पुण्याजवळ तळेगाव Pune- Talegaon येथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कंपनी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

- Advertisement -

महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन Electric vehicles (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनी मार्फत गुंतवणूक केली जात आहे. या कंपनीला राज्य सरकारच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई Industry Minister Subhash Desai यांनी यावेळी दिली.

शून्य उत्सर्जन आणि पर्यावरणपूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उद्योग विभाग, इंग्लंडच्या कॉसिस इ मोबिलीटी कंपनी यांच्यात २हजार ८२३कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन, कॉसिस ग्रुप चे संस्थापक आणि संचालक राम तुमुलुरी आदी उपस्थित होते.

राज्याच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी शासनाच्यावतीने ईव्ही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उद्योजकांचे स्वागत करण्यात येत आहे. राज्यात उद्योगांना पोषक वातावरण असून सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. कॉसिस कंपनीलाही संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगून सुभाष देसाई यांनी कंपनीचे राज्यात स्वागत केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज असून बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र ई मोबिलिटीकडे वाटचाल करीत आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याच्या राज्याच्या धोरणानुसार राज्यात गुंतवणूक करीत असल्याबद्दल ठाकरे यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.

दरम्यान, कॉसिसमार्फत तळेगाव येथे २ हजार ८२३ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून या प्रकल्पातून १ हजार २५० रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच यामुळे वातावरण बदल नियंत्रण करण्यासही मदत होईल. कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी इग्लंड येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विकसित इको सिस्टीमला चालना मिळेल. राज्यातील प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा २५ टक्के होण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या