Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणुकीचे बिगुल वाजले

निवडणुकीचे बिगुल वाजले

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ( Local Body Elections ) इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा पेच कायम असताना राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील 92 नगरपालिका ( Town council )आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या.

- Advertisement -

त्यात नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर,येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर या सात नगरपालिकांचा समावेश त्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी येत्या 18 ऑगस्टला मतदान होईल तर दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी हाती घेऊन निकाल घोषित केला जाईल. निवडणूक घोषित झाल्याने संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जात असल्याने या निवडणुका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात निवडणुका होत आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक घोषित करतील. त्यानंतर 22 जुलै ते 28 जुलै 2022 या दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जांची छाननी 29 जुलैला होईल. अपील नसेल तेथे 4 ऑगस्टला तर जेथे अपील आहे तेथे 8 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत : पटोले

केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला. केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केली. यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये याच भूमिकेचा आहे .आजही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये हीच भूमिका कायम आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या