जिल्ह्याला 38 हजार 500 करोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा ( corona Vaccination )वेग वाढल्याचे चित्र होते. 10 ते 15 हजार होणारे लसीकण 25 हजाराच्या पुढे गेले होते. मात्र पुन्हा एकदा लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील तीन दिवसात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मात्र शनिवारी जिल्ह्याला 33 हजार कोवीशिल्ड तर 5 हजार 500 कोव्हक्सिन अशा एकुण 35 हजार 500 लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे पुन्हा वेग वाढणार आहे.

जिल्ह्यात काल एकुण 14 केंद्रांवर दोन्ही मिळून 4 हजार 300 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 13 लाख 40 हजार 988 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. मात्र मागील आठवड्यात 57 हजार लस उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढला होता.

मात्र मागील तीन दिवसांपासुन पुन्हा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने पुर्वीच नोंदवलेल्या मागणीनुसार शुक्रवारी 38 हजार 500 लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे आज मागणीनुसार व लोकसंख्येनुसार लसीकरण केद्रांणा वितरण करण्यात आले आहे. यामुळे आता सोमवारपासून पुन्हा लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

काल दिवसभरात नाशिक व मालेगाव महापालिकेतील सर्व लसीकरण केंद्र बंद होती ती रविवारीही बंद राहणार आहेत. दरम्यान काळ जिल्हाभरातील 14 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात 4 हजार 20 जणांना पहिला डोस देण्यात आला. तर 280 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यात 18 ते 44 वयोगटातील 3 हजार 535 जणांचा सामावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *