बोगस प्रमाणपत्र धारकांना बसणार आळा; एमपीएससीचा मोठा निर्णय
एमपीएससी

बोगस प्रमाणपत्र धारकांना बसणार आळा; एमपीएससीचा मोठा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बोगस टायपिंग प्रमाणपत्र (Bogus typing certificate) धारकांना आळा घालण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्य परिक्षेनंतर उमेदवारांना संगणक प्रणालीवर आधारित ही परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा (Exam) पात्रता स्वरूपाची असणार आहे...

राज्य लोकसेवा आयोगाच्या ट्विटर हँडलवरून ही बातमी देण्यात आली असून याबाबतचा आदेश लवकरच काधण्यात येणार असल्याचेदेखील म्हटले आहे. लिपिक आणि कर सहाय्यक या क वर्ग संवर्गातील पदांसाठी ३० च्या गतीने मराठी टायपिंग आणि ४० च्या गतीने इंग्लिश टायपिंग असलेले प्रमाणपत्र असणे अनिवार्य होते.

परीक्षा पास होऊन सेवेत गेल्यानंतर देखील काही उमेदवार यांना टायपिंग येत नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे उदाहरणे राज्यात गेल्या काही महिन्यात घडले होते.

या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com