'त्या' युवकाचा मृत्यू घातपातानेच

'त्या' युवकाचा मृत्यू घातपातानेच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर पोलीस ठाण्यात दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दीपक दिवे हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

दरम्यान काल संध्याकाळी दीपक दिवे ह्याचा मृतदेह गोदावरी नदीत आढळून आला. शव विच्छेदन अहवालात दीपकच्या मृतदेहावर काही खुणा आढळून आल्याने सदरचा प्रकार हा घात पातानेच झाला असल्याने या बाबत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com