'त्या' शिक्षकाचा मृत्यू अपघातात नव्हे तर घातपाताने; पुतण्यास अटक

'त्या' शिक्षकाचा मृत्यू अपघातात नव्हे तर घातपाताने; पुतण्यास अटक

ताहाराबाद । प्रतिनिधी Tarahabad

बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka ) पिंपळकोठे( Pimpalkothe ) येथील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे (57) यांचा झालेला मृत्यू हा अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याचे उघड झाले असून,याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी मृत भामरे यांच्या पुतण्यास अटक केली आहे.

ताहाराबाद पिंपळकोठे रस्त्यावर रमेश भामरे यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून भामरे यांच्या भावबंधकीत जमिनीचे वाद सुरू होते, या वादा मुळे त्यांचा अपघाताने मृत्यू झाला का घातपाताने झाला याबाबत त्यांच्या कुटुबियांना संशय होता.

याबाबत त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी त्यादिशेने तपास चक्र फिरवत चोवीस तासात घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.

रमेश भामरे यांचे सख्खे पुतणे सुजित सुनील भामरे यांना आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली असून भादवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या तपासाठी उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवा. गोपीनाथ भोये,सुनील पाटील, भगरे,जितेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com