कॅनाॅॅल मध्ये आढळला दुचाकीस्वाराचा मृतदेह

अपघात की घात?, तपास सुरू
कॅनाॅॅल मध्ये आढळला दुचाकीस्वाराचा मृतदेह

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

एका दुचाकीस्वाराचा मृतदेह कॅनाॅॅल मध्ये आढळल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की , चाळीस वर्षीय ज्ञानेश्वर साहेबराव कराड आपल्या कुटुंबा समवेत , गंगापूर कॅनाल जवळ, नर्सरी समोर, कराड मळा, मखमलाबाद गाव येथे राहत होते. आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दिपक यास फोन करून सांगितले की, रात्री ज्ञानेश्वर घरी पोहचला नाही.

दिपक हा मळ्या कडे जाणाऱ्या रस्त्याने शोध घेत असता, मखमलाबाद गाव शिवारातील गायकवाड मळ्यासमोर पाटात ज्ञानेश्वर हा दुचाकी सह पडलेला आढळून आला. त्यांच्या डोक्यात गंभीर मार लागून रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे दिसले.

याबाबत गुरुवार (ता.१२) रोजी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु याबाबत अपघात की घात पोलिसानी संशय व्यक्त केला असून त्या दिशेने तपास देखील सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com