Ayodhya Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

Ayodhya Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Temple) दरवाजे सामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे...

याबाबत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा (Nripendra Mishra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी वर्षात म्हणजेच १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या (ShriRam) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण पाठवले जाणार असून प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वसामान्य भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल, असे मिश्रा यांनी म्हटले.

Ayodhya Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Nashik Accident News : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, थरारक Video आला समोर

पुढे बोलतांना मिश्रा म्हणाले की, गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाणार असून त्यावर सोन्याचे नक्षीकाम असणार आहे. तर मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर सोन्याचा मुलामा चढवण्यात येईल. त्यामुळे अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असणार आहे. तसेच देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाणार असून परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा (Prestige) लाईव्ह पाहता यावी यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Ayodhya Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Nashik Crime News : अंगावरील दागिने लुटून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल

ते पुढे म्हणाले की, राम मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणाार असून पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार असून त्यामध्ये भगवान श्री रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. तसेच या पाच मांडवाच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहे. याशिवाय आयकॉनोग्राफीचे काम देखील लवकर पूर्ण कण्यात येणार असून मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Ayodhya Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Odisha Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट? सिग्नल अभियंता कुटुंबासह फरार
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com