ब्रेक फेल झाल्याने क्रुझर दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २५ जखमी

ब्रेक फेल झाल्याने क्रुझर दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २५ जखमी

पेठ | Peth

पळशी-चिखली दरम्यानच्या वळणावर ब्रेक फेल झाल्याने क्रुझर दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पळशी येथील क्रुझर क्रमांक MH10 C 9389 क्रमांकाची प्रवाशी वाहतुक करणारे वाहन पेठ येथून बाजार व दिवाळी सणानिमित्त येणारे प्रवाशी घेऊन जात होते.

वाहनाचे पळशी - चिखली दरम्यानच्या वळणावर ब्रेक फेल झाल्याने लगतच्या दरीत कोसळले. यात २५ प्रवाशी जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.जखमींना उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठविण्यात आले.

अपघातात गंभीर जखमी झालेले धनराज लक्ष्मण पाडवी (१५) व रामदास गायकवाड (५५, रा. चिखली) हे मयत झाले. त्यातील चालक पुंडलीक कृष्णा गाडर (३२. रा. चिखली) यांच्यासह देवीदास गाडर १५ वर्ष, मुरलीधर दोडके ५२, लक्ष्मण पाडवी ३५, गोकुळ जांजर ७, लक्ष्मण तुंबडे ६०, वसंत चौधरी ४५, रेखा करवंदे ३५, मोहन जांजर ३३, वामन गायकवाड ३५, मयुर भवर १०, लक्ष्मीबाई पवार ६०, जिजाबाई गाडर ६५, साळीबाई इजल ६७, मनी मानभाव ७०, वृषाली तुंबडे १३, अंजनी भुसारे ४८, कमळीबाई ठेपणे ५०, जयराम गाडर ३२, येवाजी भवर, हरी ठेपणे ६५ सर्व राहणार चिखली तर पवना ब्राम्हणे वय १० रा फणसपाडा, कुसुम ब्राम्हणे ३५ रा. फणसपाडा, शिवराम दरोडे वय ४० रा. भुवन, मोतीराम भोये वय ६५ रा. उंबरपाडा हे जखमी झाले आहेत. हरी काशिनाथ ठेपणे यांच्या फिर्यादीवरुण पेठ पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. हवा. अंबादास जाडर अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com