जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.23 टक्के

जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७ हजार ५१८ जणांची करोनावर मात ; ३४ बळी
जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.23 टक्के
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट आली असून करोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 80 वरून 93.23 टक्क्यांवर पोहचले आहे. आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

दिवसभरात केवळ 2 हजार 276 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात त्याच्या तीन पटी पेक्षा जास्त 7 हजार 518 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 40 हजार 051 चा आकडा पार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत तब्बल साडेतीन हजाराची घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

बरे होणार्‍या रूग्णांपेक्षा पॉझिटिव्हचा आकडा तब्बल तिपटीने कमी आहे. दरम्यान मृत्युखींचे प्रमाण मात्र कायम असून आज 34 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 276 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 999 इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 268 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात केवळ 9 रूग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 64 हजार 748 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये घट झाली असून आज जिल्ह्यात 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 20 रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील 12 व मालेगाव येथील 2 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 4 हजार 4 इतका झाला आहे.तर आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये तब्बल साडेतीन हजाराने घट आली असून हा आकडा आता 23 हजार 535 इतका झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,64,748

* नाशिक : 2,14,095

* मालेगाव : 12,025

* उर्वरित जिल्हा : 1,33,547

* जिल्हा बाह्य ः 5,081

* एकूण मृत्यू: 4,004

* करोनामुक्त : 3,40,051

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com