कसारा घाटातील दरीत कंटेनर कोसळला

कसारा घाटातील दरीत कंटेनर कोसळला

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ आज सिमेंटच्या पेवरब्लॉकने भरलेला कंटेनर क्रमांक MH 48 HF 1513 च्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट संरक्षक भिंत तोडून ५० फुट दरीत जाऊन कोसळला.

या अपघातात कंटेनर चालक कंटेनर खाली अडकला होता. या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, स्वप्नील कलंत्री, विनोद आयरे, अक्षय राठोड, बाळू मांगे, जस्स्सी भाई यांना घटनास्थळी बोलावुन मदत कार्य सुरु केले.

महामार्ग पोलिसांच्या मदतीने या टीमने मदत कार्य सुरु केले. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्याचे एक प्रकारे आवाहन होते. नियोजन करून क्रेनचे बेल्ट ट्रकच्या काही पार्टला लावून थोड्या प्रमाणात वर घेतले. दोन सदस्य व एक टेम्पो चालक केबिनमधे दाखल होऊन जखमी चालकास बाहेर काढण्याचे काम सुरु केले. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गभीर रित्या अडकलेल्या जखमी चालकास सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आले.

कसारा आणि रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकाला क्रेंनच्या सहाय्याने बाहेर काढून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असताना देखील अनेक नागरिक मदत करण्याऐवजी मोबाईलवर शूटिंग करण्यात मग्न होते अशी खंत आपत्ती व्यवस्थापन टीमच्या शाम धुमाळ यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com