वेदांता फॉक्सकाँनबाबत मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरला केले हे भाष्य

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव jalgaon

वेदांता फॉक्सकाँन (Vedanta Foxconn) ला महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) कोणतेही सहकार्य केले (did not cooperate) नाही,त्या मुळेच ती  कंपनी बाहेर (company went out) गेली आणि ते आमच्यावर खापर (cracking) फोडत आहेत परंतु याची चौकशी (inquiry) करून दूध का दूध पाणी का पाणी करू असा इशारा (Warning) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिला आहे. मुक्ताईनगर (Muktainagar) येथे ते बोलत होते.

मुक्ताईनगर येथे क्रिडा संकुल मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीशमहाजन,उद्योग मंत्री उदय सामंत,पानी पुरवठा मंत्ती गुलाबराव पाटील,आमदार बच्चू कडू,आमदार शहाजीबापू पाटील,आमदार चिमणराव पाटील,आमदार किशोर पाटील,आमदार लताताई सोनवणे,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना,एकनाथ शिंदे म्हणाले,की आम्हाला 20,20 खेळायची आहे,कमी वेळेत जास्त रन काढायचे आहेत,मी आणि फडणवीस आम्ही आव्हान स्वीकारले आहे.ते आम्ही करुन दाखविणार आहोत,आमच्यावर टीका होत आहे,मात्र आपण त्याचा विचार करीत नाही,आपल्याला जनतेचं भलं करून दाखवायच आहे. ते आपण करणार आहोत.आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं जातं होय आम्ही कंत्राट घेतलं आहे,विकासच आणि जनतेला न्याय देण्याचं.

दाऊद पेक्षा मोदीचा हस्तक योग्य

नवाब मलिक यांचं नाव न घेता ते म्हणाले,आघाडी सरकार मध्ये मुंबई बॉम्ब स्फोट घडविणाऱ्यया दाऊद चा हस्तक एक मंत्री असल्याचे दिसून आले त्याच्या मांडीला मांडी लावुन तुम्ही बसता आणि आम्हाला मोदींचा हस्तक म्हणतात, दाऊद पेक्षा मोदींचा हस्तक झालेले चांगले

 सत्तेसाठी तडजोड नाही

आपण सत्तेसाठी कोणतही तडजोड केली माही,असे सांगून ते म्हणाले,ज्यांनी 25 वर्षे युती टिकवली,त्यांच्याशी युती करायची नाही तर कुणाशी करायची,त्या मुळे आम्ही बाळासाहेबांच्या विचार पुढे नेत आहोत.

खडसेंची एकाधिकार शाही संपविली

एकनाथखडसे यांच्यावयर टीका करताना ते म्हणाले ,खडसे यांनी या ठिकाणी एकाधिकार शाही निर्माण केली होती मात्र ती आता चंद्रकांत पाटील यांनी संपवून टाकली आहे,तो एकनाथ जरी चंद्रकांत यांना त्रास देत असला तरी हा एकनाथ त्यांच्या पाठिशी आहे,अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली,ते  म्हणाले मी मी म्हणणाऱ्याचा वध झाला,रावनाचा,नरकासुराचा वध झाला. त्या मुळे त्यांचेदिवस संपले आहे आता आपले दिवस आले आहेत.

खडसेंच्या त्रासाला कंटाळलो : चंद्रकांत पाटील

आमदार चंद्रकांत पाटील प्रास्ताविक करताना म्हणाले की,आपल्याला खडसे यांचा इतका त्रास झाला की,आपले सरकार असतांनाही मला त्रास त्रास झाला,आपण राजकारण सोडण्याच्या तयारीत होतो,त्यानी 35 वर्षे काहीही केले नाही परंतु आपण काम करतो तर आपल्याला त्रास दिला जातो,मुक्ताईनगरात औदयोगिक वसाहत करण्याची त्यांनी मागणी केली   या वेळी मोठया संख्येने नागरिक उपस्तीत होते अत्यंत विराट सभा होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *