'या' दिवसापासून नाशकात वाढणार थंडी

'या' दिवसापासून नाशकात वाढणार थंडी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात (maharashtra) मॅन-दौंस वादळातील (Man-downs storm) ढगाळ वातावरणाचा (Cloudy weather) प्रभाव कमी होणार असल्याने

गुरुवार (दि.१५) पासून स्वच्छ सूर्यप्रकाश तर सोमवार (दि.१९) पासुन थंडीमध्ये (cold) वाढ होणार आहे, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.

अरबी समुद्रात (Arabian Sea) क्षीण अवस्थेत उरलेले मॅन-दौंस वादळाचे अवशेष पुन्हा विकसित होऊन येमेन-ओमान किनार पट्टीकडे मार्गस्थ होणार आहे. बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाब क्षेत्राची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी (farmers) धास्ती बाळगू नये. सध्या प्रवासात असलेले व सध्या पाकिस्तान (pakistan) पर्यन्त पोहोचलेले पश्चिमी झंजावात (वेस्टर्न डिस्टरबन्स) येत्या ३-४ दिवसात काश्मीर (Kashmir), हिमाचल (Himachal), उत्तरखंडात (Uttarakhand) प्रवेशित होईल.

त्याच दरम्यान महाराष्ट्रात मॅन-दौंस वादळातील ढगाळ वातावरणाचा प्रभाव नामशेष होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच सरासरीपेक्षा ५ डिग्रीने वाढलेल्या किमान तापमानात हळूहळू तेव्हढीच घसरण होऊन सोमवार दि.१९ डिसेंबर पासुन थंडीत वाढ होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com