जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

निफाड @ 6.3, नाशिक @ 10.4
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहर व जिल्ह्यात तापमान घसरल्याने नाशिकरांना हुडहुडी भरली आहे. काल निफाड येथे 6.3 अंश तर नाशिक शहरात 10.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नाेंंद झाली. कमाल तापमातही घसरण झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

उत्तरेकडून येत असलेल्या गार वार्‍यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात वेगाने घट होत आहे.निफाड तालुक्यात 6.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका थंडीने गारठून गेला होता.

निफाड तालुक्यात 21 नोव्हेंबर रोजी 7 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती.त्यामुळे थंडीचा कडाका वाढतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर तापमानात वाढ होत जाऊन थंडीचे प्रमाण कमी झाले होते व वातावरणात उष्मा वाढला होता.

मात्र 18 दिवसानंतर 9 डिसेंबर रोजी निफाड तालुक्यात 7.2 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली व अवघ्या एकाच दिवसात 0.9 इतके तापमान कमी होऊन काल तालुक्यात 6.3 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com