हुडहुडी! नाशिक @ 7.6

हुडहुडी! नाशिक @ 7.6

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

थंडीचा (cold) जोर अद्याप कायम असुन नाशिक (nashik) मध्येही किमान तापमान (Minimum temperature) 7.6 अंंशावर स्थिरावल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

शीतलहरींमुळे (cold waves) सकळ सायंंकाळ नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याचा कॅलिफोर्निया (California) म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाडला (niphad) यंदाच्या हंगामातील सर्वात निचांंकी तापमानाची नोंद झााली आहे, तेथे अवघ्या 5 अंशावर पारा घसरला, तो ही अद्याप कायम आहे. हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी (cold) जाणवत आहे. दम्याच्या रुग्णाांंना त्याचा त्रास मोठ्या प्रमााणावर जाणवत आहे.

हवेत गारवा असल्याने सर्दी खोकल्याचे रुग्ण (cold, cough) वाढले आहेत. त्यामुळे क्लिनिकला गर्दी वाढत आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे तापमानात घसरण होत असून आरोग्याच्या (health) तक्रारीत वाढ झाली आहे. घराबाहेर पडताना उबदार कपडे, पाणी पिताना कोमट पाण्याचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा (mask) वापर करावा, लहान मुले, वृध्द्द यांची या काळात काळजी घयवी असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com