टप्प्याटप्प्याने शहरातील करोना सेंटर होणार बंद

टप्प्याटप्प्याने शहरातील करोना सेंटर होणार बंद

ठक्कर डोम मध्ये आता नवीन रुग्ण नाही

सातपूर । प्रतिनिधी

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये करोना रुग्णांची संख्या आता घटत आहे. म्हणून महापालिकेने टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ठक्कर डोममधील कोव्हिड सेंटरमध्ये यापुढे नव्याने रुग्ण दाखल करू नये, असे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी रुग्णांना उपचारासाठी बेडही मिळत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे बिटको, डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयासह महापालिकेने ठक्कर डोम, समाजकल्याण, मेरी, सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे कोव्हिड सेंटर सुरू केले होते. मात्र, करोना नियंत्रणासाठी लागू केलेला कडक लॉकडाउन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील करोनाबाधितांचे प्रमाण झपाट्याने घटले आहे. यामुळे आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय विभागावरील मनुष्यबळाचा ताण कमी करण्यासाठी कोव्हिड सेंटर मर्यादित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ठक्कर डोममधील ३२५ बेडचे कोव्हिड सेंटर बंद केले जाणार आहे. या ठिकाणी सध्या ६० रुग्ण असून, येथे नव्याने रुग्ण दाखल करू नये, असे सूचना देण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे वैद्यकीय विभागाला रुग्णांना 'नवीन नाशिकच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आले आहेत. दरम्यान महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी यांची एकत्रित माहिती सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत. या ठिकाणची एकूण मंजूर पदे, सध्या कार्यरत आणि रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com