
पाचोरा Pachora (प्रतिनिधी)
एकनाथ शिंदे कालही, उद्याही कार्यकर्ता होता आणि कार्यकर्ता म्हणून काम करतो. आपला माणूस म्हणून जनता मला पाहते. हीच आमच्या कामाची पोहच पावती आहे. सत्तेची हवा (air of powe)आमच्या डोक्यात (heads) नाही राज्य आर्थिक सक्षम करण्याच्या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. महाज्योती योजनेच्या माध्यमातून अल्प समाजांना फायदा मिळवून देण्याचा मानस आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी केले.
पाचाोरा तालुक्यातील लोहारी येथे चामुंडा माता मिशन संचलित अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या वतीने दि. ९ जानेवारी रविवार रोजी बडगुजर समाजाचे महा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी चामुंडा माता व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून घणाघाती भाषणाची सुरुवात केली. नुकतेच हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त होतो. यातून मुक्त झाल्यानंतर सातारा येथील माझ्या गावात गावकऱ्यांनी कार्यक्रम घेतला होता. आमदार किशोर पाटील व बडगुजर समाजाने कार्यक्रमास येण्याचा आग्रह केला होता. या कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुढे म्हणाले की मागील दोन अडीच वर्षाच्या काळात सर्व कार्यक्रमांना बंदी होती परंतु आपलं सर्वसामान्यांचे सरकार आल्यापासून मी सर्व निर्बंध हटविले.
गणपती नवरात्र व गोकुळाष्टमी दिवाळी सारखे सण व उत्सव जनतेने उत्साहाने साजरे केले आम्ही पण ३० जूनला मोठी दहीहंडीचा फोडल्याचा टोला लगावला. सर्व सणांवरचे निर्बंध हटवून मोकळ्या वातावरणात लोकांनी सण आनंदात साजरे केले. दिवाळीला १०० रुपयात फराळाचे साहित्य देखील राज्य सरकारने वाटप केले. समाज छोटा असला तरी माणसं मोठी असतात. मी एकदा शब्द दिला की तो फिरवत नाही आणि दिलेला शब्द पाळतो म्हणून ५० लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला.
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही राज्याचा कारभार करीत आहोत. सर्वसामान्य आणि शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असा प्रश्नही उपस्थित केला. बळीराजा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याचे आयुष्य बदलले पाहिजे. हे सरकार सर्व सामान्य घटकांचे आहे सरकार स्थापन केल्यानंतर शेतकरी, कष्टकरी आणि मागील सर्व प्रलंबित प्रश्न लावून लोकहितांचे निर्णय हे सरकार घेत आहे ऐतिहासिक अश्या तीस हजार पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
ग्रामीण भागाला न्याय देण्याचे काम सरकार करीत आहे. सर्व निर्णय धाडसाने घेतले जात आहे. सरकार स्थापन केल्या नंतर डिझेल व पेट्रोलचे दर कमी करण्याचा पहिला निर्णय घेतला. विश्वास आणि एकजूट महत्वाची असते. सच्चाईची एकजूट आम्ही मागील काळात दाखवली आणि सरकार स्थापन केले. आमच्या संख्येवर जाऊ नका एकजूट महत्वाची आहे. राज्य सरकार हितांचे जनहितांचे निर्णय घेत असल्याने हे सरकार लोकप्रिय होत आहे. विश्वास आणि शब्द पाळून ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यास कोणीही पराभूत करू शकत नाही. हीच जिद्द व ध्येय उराशी बाळगून आम्ही राज्य सरकारमध्ये काम करीत आहोत.
शैक्षणिक प्रगती साधत असतांना २५ हजार उद्योग व उद्योजक घडविण्याचा निर्णय घेतले आहेत. यात सर्व समाजाला न्याय मिळणार आहे. तसेच ५०० कोटींची विकास योजना राज्यात राबविली जाणार आहे. आम्ही जनतेला देणारे आहोत घेणारे नाहीत. आम्ही राजे नसून जनता आमची राजा आहे. राज्याच्या जनतेचे सेवक म्हणून हे सरकार काम करीत आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे ते म्हणाले
. राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या माध्यमातून दोन लाख कोटींचा विकासनिधी केंद्राने राज्याला दिला आहे. केंद्रात बडगुजर समाजाला आरक्षण तसेच मुंबई, पुणे, ठाणे येथे वस्तीगृहाची जागा, समाज भवन याची तरतूद करणार असल्याचा मनोदय शेवटी मुख्यमंत्री यांनी बोलून दाखविला.
प्रास्ताविकात नरेंद्रसिंग बडगुजर म्हणाले कि, समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले असून समाज साक्षर होत आहे परंतु या समाजाला राज्य व केंद्र सरकारकडून अपेक्षित असे अजून काही मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्थहीन,भूमिहीन, शैक्षणिक दृष्ट्या अडचणीत आणि अनेक समस्या असलेल्या या समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार किशोर पाटील म्हणाले की छोट्या व अत्यल्प असलेल्या समाजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांचे येणे हे ऐतिहासिक म्हणावे लागेल. मुख्यमंत्री जीवाची पर्वा न करता कोणत्याही छोट्या कार्यक्रमांना जातात. जेथे जातात तेथे मात्र काहीतरी देतात. राज्यात अतिशय अल्प असलेल्या या समाजाला मुख्यमंत्री समाधानी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पाचोरा शहर विकासाभिमुख आणि सुंदर बनविण्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री नामदार शिंदे यांचेच आहे. पुढील पाचोरा शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी पाचोरा नगरीत येण्याची विनंती आमदारांनी केली. आणि मुख्यमंत्री कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार व्यक्त केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले की छोट्याशा बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांनी येऊन या समाजाला उपकृत केले. जगाच्या इतिहासात नोंद करण्यासारखा हा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अचानक निश्चित झाल्याने आमच्यासह प्रशासनाची तारांबळ उडाली. माणूस उंचीने नव्हे तर कर्तुत्वाने उभा राहतो. संकटात जो उभा राहतो तोच खरा नेता असतो. हा समाज अत्यल्प असला तरी या समाजाच्या तरुणांनी कधीही नोकरी मागितली नाही, जे मिळेल त्यात समाधान मानून शेती व्यवसाय करून आणि शिक्षण घेऊन हा समाज मोठा होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमदार,मंत्री मुख्यमंत्री झालो असे गर्वाने सांगितले. या समाजाचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ना. गिरीश महाजन म्हणाले की आम्ही सर्व गुजर समाजाचे अंग आणि एकच आहोत. आमच्या मध्ये रोटी -बेटी ही प्रथा नसली तरी भविष्यात एकत्र येण्यासाठी समाज जोडणार असल्याचे मत व्यक्त केले. विखुरलेला हा समाज सर्वत्र स्थायिक झालेला आहे. व्यक्ती समाज, पैसा, जात, व धर्म यावर नव्हे तर व्यक्ती गुणावर मोठा होतो. मनाशी खुणगाट बांधली तर काहीही अशक्य नाही. गुजर समाज ओबीसी असला तरी केंद्रात या समाजाला मान्यता नसल्याने हा प्रश्न तडीस नेण्याचा निश्चय ग्रामविकास मंत्र्यांनी व्यक्त केला. एकनाथराव शिंदे हे कसे मुख्यमंत्री झाले यावर आमचा देखील विश्वास बसला नव्हता. हे एवढं सोपं नव्हतं शिवसेनेतून कंटाळून ४०-५० आमदार बाहेर पडले. हे ऑपरेशन अत्यंत कठीण होते. मागील एक मुख्यमंत्री घरी बसून काम करीत होते तर एकनाथराव शिंदे रात्रंदिवस जनहिताचे कामे करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचे कार्य करीत आहे.
यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, पारोळा आ. चिमणराव पाटील , पाचोरा -भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,चोपडा आमदार चंदू अण्णा सोनवणे,खंडवा-बुऱ्हानपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, अधिवेशन अध्यक्ष उमेश करोडपती, आमदाबादचे उद्योगपती कैलास बडगुजर, माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, संजय गोहिल,माजी जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, मधुकर काटे, भुरा आप्पा पाटील, पदमसिंह पाटील, भाजपा पदाधिकारी सुभाष पाटील, नंदू सोमवंशी, यांच्यासह पाचोरा भडगाव मतदार संघातील बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व बडगुजर समाजाचे राज्यभरातून व भारतातून आलेले पुरुष- महिला पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.