Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याघामाला दाम, कष्टाला मान देणारा हा अर्थसंकल्प; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर

घामाला दाम, कष्टाला मान देणारा हा अर्थसंकल्प; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis government) राज्यासाठीचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दि. ९ रोजी विधान सभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून “दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प (Budget) अर्थमंत्र्यांनी सादर केला” अशा शब्दात टीका केली आहे.

- Advertisement -

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प; भुजबळांची राज्य सरकारवर टीका

तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजराचा हलवा’ असल्याचे म्हटले आहे. विरोधक या अर्थसंकल्पाविषयी समाधानी नसले तरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मात्र, हा अर्थसंकल्प गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय देणारा आहे असे म्हटले.

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ (Panchamrit) महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग, पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याबरोबरच, समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असे म्हणत विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या