Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याछत्रपती घराणे मविप्रच्या कायम पाठीशी

छत्रपती घराणे मविप्रच्या कायम पाठीशी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राजर्षी शाहू महाराजांचे ( Rajshree Shahu Maharaj ) नाशिकसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. मविप्र संस्था ( Maratha Vidya Prasarak Sanstha )व कर्मवीर गणपतदादा मोरे यांना ताकद देण्याचे काम शाहू महाराजांनी केले.आमचे छत्रपती घराणे हे पूर्वीपासून मविप्र संस्थेच्या पाठीशी होते. यापुढेही भक्कमपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale)यांनी आज येथे दिली.

- Advertisement -

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मविप्रच्या गंगापूररोड येथील उदोजी मराठा बोर्डिंगला सदिच्छा भेट देऊन मविप्र संस्थेच्या कार्याचा गौरव केला. या संस्थेच्या प्रांगणात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शैक्षणिक संग्रहालयालाही त्यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केली.

यावेळी मविप्रचे संचालक नानासाहेब महाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संचालक सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे, डॉ.एन.एस.पाटील, डॉ.अजित मोरे, डॉ.एस.जे. कोकाटे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, करण गायकर, गणेश कदम, संग्रहालयाच्या प्रशासक सीमा जाधव उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की,राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी व जयंतीनिमित्त या ऐतिहासिक उदोजी बोर्डिंगला भेट देताना मला अत्यंत आनंद होत आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून शाहू महाराजांनी बहुजन समाज शिक्षित झाला पाहिजे, हा विचार समोर ठेवून कार्य केले. 1920 मध्ये मविप्र समाजाला त्यांनी देणगी दिली. बहुजनांचा विकास व तळागाळामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे उल्लेखनीय कार्य शाहू महाराजांनी केले. उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये उभारलेले उदोजी महाराज शैक्षणिक वास्तू संग्रहालय हे महाराष्ट्राबरोबरच देशालाही प्रेरक ठरेल.

संचालक नानासाहेब महाले म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी उदोजी मराठा बोर्डिंगला भेट दिली होती. त्यानंतर आज त्यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी येथे भेट दिली. त्यामुळे हा परिसर धन्य झाला आहे.

समाजातील शेवटच्या घटकाचाही विकास व्हावा, यासाठी शाहू महाराजांचे घराणे पूर्वीपासून तनमनधनाने कार्य करत आहे. मविप्र संस्थेलाही त्यांनी सहकार्य केले आहे.यापुढेही त्यांच्या घराण्याचे मविप्रला असेच सहकार्य व वरदहस्त कायम राहील अशी खात्री आहे. संचालक सचिन पिंगळे प्रास्तविकात केले. डॉ.दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे यांनी आभार मानले. मराठा हायस्कूल गीतमंचाने स्वागत गीत सादर केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.आर.देवने, बी. आर. पाटील,आय. बी. चव्हाण, ज्योती लांडगे, प्राध्यापक,विद्यार्थी आदी उपस्थित होते.

नाईक शैक्षणिक संकुलात कार्यक्रम

येथील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नाईक शैक्षणिक संकुलात छत्रपती शाहू महाराज जयंती स्मृती शताब्दीनिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वराज्य प्रमुख श्रीमंत संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरेे होते. तसेच उपाध्यक्ष अ‍ॅड. पी.आर. गिते, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहसरचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त दामोदर मानकर, बाळासाहेब वाघ, दिगंबर गिते, विलास आव्हाड ,सुरेश घुगे , विष्णूपंत नागरे, श्याम बोडके, नयना आव्हाड, शोभा बोडके उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत धात्रक यांनी केले. स्वागत दामोदर मानकर यांनी केले.

या कार्यक्रमास बाळासाहेब वाघ, दिगंबर गिते, संचालक विलास आव्हाड ,सुरेश घुगे, विष्णूपंत नागरे, श्यामभाऊ बोडके, पी.पी धात्रक ,धर्माजी बोडके, डी.पी आव्हाड, वासुदेव भगत,कारभारी काकड ,करण गायकर , गणेश कदम, राजू देसले,शिक्षणाधिकारी मोहन चकोर, श्रीमती नयना आव्हाड, प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे, प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे, प्राचार्य डॉ.संजय सानप,प्राचार्य डॉ.अविनाश दरेकर, उपप्राचार्य डॉ. पौर्णिमा बोडके, प्रमोद आव्हाड ,डॉ. बाळासाहेब चकोर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शरद काकड यांनी केले तर संचालक सुरेश घुगे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या