ब्लॅकस्पॉट हटवण्याचे मनपासमोर आव्हान

ब्लॅकस्पॉट हटवण्याचे मनपासमोर आव्हान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेकडून ( NMC ) स्वच्छतेवर कोट्यवधींचा खर्च केला जातो आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत:चे सफाई कर्मचारी आहे. कोट्यवधी रुपये खर्चून नाशिककरांच्या माथी मारलेल्या आउटसोर्सिग ठेक्याच्या माध्यमातून सातशे कर्मचारी व घंटागाडी देखील आहे. असे असूनही शहरातील अस्वच्छतेचे ब्लॅकस्पॉट ( Black Spot ) हटविण्यात पालिकेच्या स्वच्छता विभागाला सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.

शहरातील घराघरातील कचरा, सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था आहे. घंटागाडीकरिता दीडशे कोटींना देण्यात आला. आता हाच ठेका पुढच्या काही दिवसांत 354 पर्यंत जाणार आहे. आउटसोर्सिगच्या माध्यमातून सातशे कर्मचारी जे खासगी ठेकेदाराकडून शहरातील साफसफाईसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्याचा कितपत उपयोग शहराला होत आहे. हे शोधण्याची गरज आहे. पूर्वीपासून नाशिक शहरातील विविध भागात अस्वच्छतेचे ब्लॅक स्पॉट होते ते आजही जसेच्या तसेच आहे. पालिका कोट्यवधींचा खर्च करते. तो पैसा जातो कुठे, असा संतप्त सवाल नाशिककर करत आहे. ठेकेदारांच्या मेहरबानीसाठी आणि काही लोकांना खुश करण्यासाठी पालिकेतील काही अधिकार्‍यांची मोनोपॉली काम करत आहे का, अशीही चर्चा आहे.

दरम्यान नाशिककरांच्या येणार्‍या कराच्या पैशांचा चुराडा यातून सुरु असल्याचा आरोप सुजाण नागरिक करीत आहेत. शहरातील स्वच्छतेच्या गुणवत्तेत भर पडायला हवी होती. ती अद्यापही पडलेली दिसत नाही. मग कोट्यवधी रुपयांची उधळ्पट्टी कशासाठी व कोणासाठी सुरु आहे. असा प्रश्न आता केला जातोय. शहरातील कचर्‍यांचे ब्लॅक स्पॉट आहेत. त्याकडे घनकचरा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी, कर्मचारी संबंधित ठिकाणी जात नसून पाठ फिरवत आहे. रस्त्याच्या बाजूलाच तशीच कचर्‍याचे ढीग पाडले जात आहे. स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारीही ब्लॅक स्पॉट प्रश्नी गंभीर नसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com