संजय राऊत, आदित्य ठाकरेंची CBI चौकशी करा
SSR case-Aaditya Thackeray-Sanjay Raut
मुख्य बातम्या

संजय राऊत, आदित्य ठाकरेंची CBI चौकशी करा

BJP प्रवक्ता निखिल आनंद यांनी केली मागणी

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची सुशांतसिंग राजपूत मृत्यु प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी बिहार येथील भाजपा प्रवक्ता निखिल आनंद यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाचे राजकारण करत असून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी महाराष्ट्र सरकारवर केला आहे.

निखिल आनंद यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं की, शिवसेनेनं सामनातून एक फडतूस लेख लिहीला होता. या लेखातून सुशांतचे चाहते, परिवार आणि बिहार पोलिसांचा अपमान करण्यात आला आहे. एवढ मात्र निश्चित आहे की शिवसेनेच्या नेते सीबीआयच्या चौकशीला घाबरून आहेत तसेच या प्रकरणामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही यामुळे अडचणीत आले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com