Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याINDIA Alliance : इंडिया आघाडीची रद्द झालेली बैठक आता 'या' तारखेला होणार

INDIA Alliance : इंडिया आघाडीची रद्द झालेली बैठक आता ‘या’ तारखेला होणार

नवी दिल्ली | New Delhi

विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting) आज बुधवार (दि.०६ डिसेंबर) रोजी दिल्लीत बैठक होणार होती. पंरतु, मिचाँग चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) इंडिया आघाडीची ही बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात होते. तसेच विरोधीपक्षांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर आता विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची नवी तारीख समोर आली आहे…

- Advertisement -

Uddhav Thackeray : …तर निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणनीती ठरवण्यासाठी नवी दिल्लीत आज बुधवार (दि.०६ डिसेंबर) रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार होती. काँग्रेसने (Congress) बोलावलेल्या या बैठकीला विरोधीपक्षातील बडे नेते सहभागी होणार होते. मात्र, मिचाँग चक्रीवादळाचे कारण देत ही बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बैठक रविवार (दि.१७ डिसेंबर) रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Assembly Elections Results 2023 : चार पैकी भाजपची तीन तर कॉंग्रेसची एका राज्यात आघाडी

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाच पैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच इंडिया आघाडीतील नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी हे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही बुधवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले होते. त्यामुळे विविध कारण देत इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

MLA Prakash Solanke : “राजकीय विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला”; आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या