Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-पुणे महामार्गावर 'द बर्निंग बस' चा थरार; प्रवाशी बालंबाल बचावले

नाशिक-पुणे महामार्गावर ‘द बर्निंग बस’ चा थरार; प्रवाशी बालंबाल बचावले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकहुन प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे (Nashik to Kolhapur Luxury bus) जाणाऱ्या बसला नाशिक पुणे महामार्गावर (nashik pune highway) भीषण आग लागली. (fire to bus) चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानासह बस जाळून खाक झाली आहे….

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लक्झरी बस निघाली होती. स्लीपर कोच असल्यामुळे ३० ते ३५ प्रवासी या बसमध्ये होते. शिंदे पळसे येथील टोलनाका सोडल्यानंतर बस मोहदरी घाटात आली.

याच वेळी गाडीच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले. (Mohadari ghat, sinnar)

सर्व प्रवासी गाडीतून बाहेर पडले. मात्र काही प्रवाशांचे सामान हे गाडीच्या डिकीत होते, तर काहींचे बर्थमध्ये राहिले होते.

बघता-बघता एसीमध्ये शोर्टसर्किट झाले अन संपूर्ण बसला आगीने वेढा घातला. काही क्षणातच बसचा केवळ सांगाडा उभा राहिलेला दिसून आला. बसमधून बाहेर पडल्यानंतर योगिता पाटील नामक महिला प्रवासीने हा संपूर्ण प्रसंग ‘देशदूत’सोबत शेअर केला.

मोहदरी घाटात बसला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.

चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घाटात या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली वाहन वाहतूक पूर्ववत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या