
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालखेड धरणाच्या (Palkhed Dam) पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. यामुळे कादवा नदीला (Kadwa River) पूर आला असून रवळस पिंपरी जवळील पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यावर जाणारा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
निफाड तालुक्यातील कादवा नदीला पालखेड धरणातून (Palkhed Dam) आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान 20 हजार 770 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
कादवा नदीपात्रात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत रवळस येथून निफाड सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गात बॅरिकेट टाकून प्रशासनाने सतर्कता म्हणून आधीच मार्ग बंद केला होता.
दरम्यान पालखेड धरणाचे (Palkhed Dam) पाणी नदीपात्रात आल्याने पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास 20 किलोमीटरचा फेरा पडणार आहे.