Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या350 रुपयांची लाच... ठपका 24 वर्षे

350 रुपयांची लाच… ठपका 24 वर्षे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या 24 वर्षांपूर्वी साडेतीनशे रुपयांची लाच ( Bribe ) घेतल्याप्रकरणातील संशयित पोलीस उपनिरीक्षक अखेर निर्दोष सुटलेे असून आता त्यांंना गेल्या 24 वर्षांची भरपाई सव्याज मिळणार आहे. ‘भगवान के घर देर है लेकीन अंधेरा नही’ अशाच प्रतिक्रिया या निकालावर व्यक्त होत आहेत.

- Advertisement -

या खटल्याची माहिती अशी की, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक ( ACB) विभागाने 1988 मध्ये येवल्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दामू आव्हाड (Sub-Inspector of Police Damu Awhad)यांच्याविरुद्ध 350 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

भ्रष्टाचार प्रकरणी 24 वर्षांपूर्वी दोषी ठरलेल्या आणि एका वर्षाची शिक्षा झालेल्या पोलीस कर्मचार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आव्हाड यांनी 350 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी अपयशी ठरल्यानेे न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले आहे.

कनिष्ठ न्यायालयात दोषी, उच्च न्यायालयात निर्दोष

ऑगस्ट 1998 मध्ये नाशिकच्या विशेष न्यायालयाने दामू आव्हाड यांना दोषी ठरवून एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आव्हाड यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती व्ही.जी. वशिष्ठ यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी केवळ पैशांच्या वसुलीच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, असे म्हटले. त्यानंतर फिर्यादी पक्ष आव्हाडांंविरुद्धचा खटला सिद्ध करण्यातही साफ अपयशी ठरला.

काय आहे प्रकरण

येवला तालुका पोलीस ठाण्यात( Yeola Taluka Police Station) तैनात असलेल्या तत्कालीन उपनिरीक्षक आव्हाड यांंनी लाच न मागता उलट एका व्यक्तीला जामिनासाठी आर्थिक मदत देऊ केली होती.

मात्र गैरसमजातून 350 रुपयांची लाच मागितली असा आरोप झाला आणि 24 वर्षे त्यांना सामाजिक निंदा आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. आता मात्र आरोपाचे ग्रहण सुटल्यानंंतर त्यांच्यावर अच्छे दिनाची बरसात झाली आहे.

येत्या पंधरा दिवसांत गृहखात्याला त्यांचा उरलासुरला सर्व हिशेब पूर्ण करून द्यावा लागणार आहे. जेवढा त्रास सहन केला त्याच्या दुप्पट आता आनंद झाला आहे.दुरावलेले मित्र, आप्त आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या