Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानृत्यदैवतांच्या विविध लिलांचे सुरेख दर्शन; नटराज पं. गोपीकृष्ण महोत्सवाची सांगता

नृत्यदैवतांच्या विविध लिलांचे सुरेख दर्शन; नटराज पं. गोपीकृष्ण महोत्सवाची सांगता

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

कृष्ण (Krushna) आणि देवादी देव महादेव (mahadev) या नृत्यदैवतांंच्या विविध लिलांची सुरेख रुपे उलगडत, श्रवणीय पदन्यास, नृत्याचे मनोहरी दर्शन घडवत 29 व्या नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाची (Nataraj Pt. Gopikrishna Jayanti Mahotsav) आज उत्साहात सांगता झाली.

- Advertisement -

कीर्ति कला मंदिरातर्फे (Kirti Kala Mandir) गेल्या तीन दिवसांपासून शहरात हा उडान महोत्सव सुरु होता. आज श्री विश्वदीप शर्मा (Shri Vishwadeep Sharma) व किर्ती कला मंदिराच्या नृत्यांगणांच्या स्पेक्ट्रम (Spectrum) या मनोहक नृत्यविष्काराने महोत्सवाचा समारोप झाला. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Upper Collector Dattaprasad Nade) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.

यावेळी एमआटीच्या संचालिका शेफाली भुजबळ (MAT Director Shefali Bhujbal), ज्येष्ट पत्रकार सुरेश भटेवरा (Senior Journalist Suresh Bhatewara), अ‍ॅॅड. नंदकिशोर भुतडा (Adv. Nandkishore Bhutada), पं. अविराज तायडे (Pt. Aviraj Taide) आदींसह अनेक मान्यववर उपस्थित होते.

प्रारंभ श्री. विश्वदीप शर्मा यांच्या उठावदार नृत्याने झाला. श्रीकृष्ण (shree krishan) आणि महोदव यां दोन्ही नृत्यदैवतांच्या विविध लिलांचे सुरेख दर्शन त्यांनी घडवीले. कृष्णाच्या रुपाबरोबरच त्यांचे नटखट लिलांचे दर्शन एैसे हठीलो छैल मग रोकत है गिरीधारी। या ठुमरीने नजकातीसह दर्शवले. कार्यक्रमाच्या अंतूम चऱणात अदिती पानसे दिग्दर्शीत स्पेक्ट्रम या लोभस दमदार नृत्यविष्कार पेश करुन झाला.

रेखाताई व शर्माताई यां गुरुद्वयींकडुन मिळालेला नृत्यवारसा अदिती पानसे (Aditi Panse) यांनी पुढील पिढीपुढे ठेवला. पारंपरिक अभिजातेचा डौल सहज सुंदर उत्स्फूर्त लयबध्द गतीशिलतेचा त्रीवेणी संगम स्पेक्ट्रममधून सादर झाला. लहान मोठ्या सर्वच नृत्यंगणांनी चपखल, लयबध्द, पदन्यास देखण्या अभिनयातून रसिकांना खिळवून ठेवले. देस रागातील चतुंरंग अदिती पानसे (Aditi Panse) व दुर्वाक्षी पाटील (Durvakshi Patil) या गुरु- शिष्य जोडीने रंगवीले. किर्ती कला मंदिराच्या नृत्यागणांनी पं. बिन्दा महाराज रचित शेषफण उगमगयो रागाने कार्यक्रमाची सांगता झाली.

चढत्या क्रमाने अधिकाधिक उंचावत जाणारा हा नृत्यांनंद जलदगतीतील पदंत, परण, चक्कर, ततकारने पूर्णत्वास गेला. सूत्रसंचालन देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Executive Editor of Deshdoot Dr. Vaishali Balajiwale) यांनी केले. 1994 पासून दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कीर्ति कला मंदिर आयोजित तीन दिवसीय नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव दोन वर्ष ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला.

करोनाच्या काळात नृत्यकलेचे शिक्षण ज्यांनी ‘ऑनलाईन’ सुरु केले आणि सुरु ठेवले, त्या सगळ्या छोट्या मोठ्या कीर्ति कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी तीन दिवसांचा हा महोत्सव यशस्वी केला. कथकच्या समग्र परंपरेचा गतिशिलतेचा, रसिकांनी ह्या तीन दिवसीय नृत्य महोत्सवाचा आनंद घेतला. किर्ती कला मंदिराच्या संचालिका रेखाताई नाडगौडा यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या