आज ज्येष्ठा गौरींचे आगमन

आज ज्येष्ठा गौरींचे आगमन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival )काळात चौथ्या दिवशी म्हणजे आज ज्येष्ठां गौरींचे ( Jeshtha Gauri ) आगमन होत आहे. आजपासून तीन दिवस महालक्ष्मीचा उत्सव घरोघरी साजरा होणार आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते.

बाप्पांच्या आगमनापाठोपाठ आज ज्येष्ठा गौरींचेही ( Jeshtha Gauri ) सोनपावलांनी घरोघरी आगमन होत आहे. गौराईच्या आगमनाने श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. ज्येष्ठा गौरीचे आवाहन रात्री 10.56 पर्यंत आहे.

आज ज्येष्ठा गौरींचे आगमन झाल्यानंतर विधिवत पूजन केले जाईल. रविवारी महापूजा होईल. त्यासाठी नैवेद्यात 16 भाज्या त्यात गवार, भेंडी, दोडके, गिलके चाकी, गंगाफळ, तोडले, चाकवद, सुरण, आंबटचुका, वाल, वटाणे, भोपळा, काकडी, बटाटे व पडवळीचे महत्त्व राहणार आहे. तसेच सांजोर्‍या, करंजी, लाडू, पुरणपोळी, अंबील यासह पंचामृताचा समावेश राहील.

विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून मनमोहक सजावट करत आकर्षक उभ्या गौरी तसेच चौरंगावर मुखवटे ठेवून आरास केली जाईल. सोमवारी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com