कोणत्याही परिस्थितीत अग्निपथ योजना मागे घेणार नाही - अनिल पुरी

कोणत्याही परिस्थितीत अग्निपथ योजना मागे घेणार नाही - अनिल पुरी

नवी दिल्ली । New Delhi

केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या (Agneepath scheme) विरोधात देशभरात अनेक ठिकाणी युवकांची निदर्शने (Demonstrations) सुरू आहेत. बिहारमध्ये (Bihar) तर युवकांच्या आंदोलनाला (Movement) हिंसक वळण लागले असून अनेक रेल्वेंना (Railways) आग (fire) लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी वयोमर्यादा आणखी दोन वर्षांनी वाढवली. तर संरक्षण मंत्रालय (Ministry of Defense) तसेच कोस्ट गार्डने या अग्निवीरांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सेनेच्या तीनही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली...

याबाबत अधिक माहिती देतांना डीएमएचे अतिरिक्त सेक्रेटरी (Additional Secretary DMA) अनिल पुरी (Anil Puri) यांनी म्हटले आहे की, अग्निपथ ही योजना आजची नसून या योजनेची सुरुवात १९८९ मध्ये करण्यात आली होती. ही योजना लागू करण्यासाठी परदेशातील सैन्यातील नियुक्त्या आणि तेथील एक्झिट प्लॅनबाबत पूर्ण अभ्यास करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही योजना मागे घेणार नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer recruitment process) तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. याशिवाय पोलीस व्हेरिफिकेशनचे पत्र शंभर टक्के करावे लागणार असून ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवेत भरती (Recruitment service) होता येणार नाही. तसेच सेवा शर्तींमध्ये त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नसून सैन्याचे जवान जे कपडे घालतात तेच त्यांनाही दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, येत्या चार ते पाच वर्षांत ५० ते ६० हजार सैनिक (Soldiers) भरले जाणार असून भविष्यात ही संख्या ९०००० ते १ लाख पर्यंत वाढविण्यात येईल. याशिवाय ४६००० अग्निवीरांची भरती ही विश्लेषण करण्यासाठी सैन्यदलाने उचललेले पहिले पाऊल असल्याचे देखील पुरी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com