Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र ATS ला झटका, NIA कडे तपास

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र ATS ला झटका, NIA कडे तपास

ठाणे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्यातNIA विरुद्ध ATS असा सामना सुरू रंगला होता. आता या सामन्याचा निकाल न्यायालयानेच दिला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला झटका बसला आहे.

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले होते. त्यानंतरही एटीएसने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला नव्हता. तसेच एटीएसने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. मंगळवारी एटीएस प्रमुख जयजितसिंग यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद देखील घेतली होती. अखेर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा तपास एनआयएकडे हस्तांतरीत करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

काय आहे प्रकरण

मनसुख हिरेन प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. एटीएसने हिरेन याच्या हत्येचा प्रमुख आरोपी सचिन वाझे असल्याचा आरोप करत त्यांची एनआयएकडून कोठडी मागितली होती. मात्र आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या