साहित्य संमेलन अध्यक्ष हिंडता फिरता असला पाहिजे

नारळीकरांच्या अनुपस्थितीवरून ठाले-पाटील नाराज
साहित्य संमेलन अध्यक्ष हिंडता फिरता असला पाहिजे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Naralikar) साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास उपस्थित न राहिल्याबद्दल अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील (Kautikrao Thale-Patil) यांनी खेद व्यक्त केला...

मागील संमेलनात फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती चांगली नव्हती. त्यानंतरही ते कशा पद्धतीने संमेलनासाठी आले, त्याचे उदाहरण कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. त्यापद्धतीने जयंत नारळीकर आले असते आणि तासभर बसले असते तर चांगले झाले असते, असे त्यांनी सांगितले.

आता यापुढे अध्यक्ष निवडतांना काळजी घेतली पाहिजे. हिंडता-फिरता असणाऱ्या व्यक्तीची यापुढे साहित्य संमेलन अध्यक्षपदी केली गेली पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

नाशिकचे साहित्य संमेलन रखडत गेलेले साहित्य संमेलन अखेर थाटामाटात झाले याचा आनंद आहे. एकच उणीव भासते आहे ती म्हणजे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आले असते तर अधिक आनंद झाला असता.

प्रकृती अस्वास्थामुळे नारळीकर येऊ शकले नाहीत असे सांगण्यात आले आहे. साहित्य संमेलनअध्यक्ष उपस्थित न राहिल्याने वेगळी किनार या साहित्य संमेलनाला लागली आहे.

साहित्य संमेलनमागील मेहनत मोठी आहे. त्यामुळे महामंडळाला दक्षता घेतली पाहिजे. हिंडता फिरता महामंडळ अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशी काळजी जाईल याची काळजी घेतली पाहिजे.

नाशिकचे संमेलन सर्वात जास्त वेळ वेठीस धरले गेले. आजवर एकही समेंलन इतके वेठीस धरले गेले नसल्याचे यावेळी ठाले पाटील यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com