Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार

नाशिक मनपा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणुकीच्या (election) दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची (Political parties) तयारी सुरू आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे (Youth Sena chief former minister Aditya Thackeray) यांची मागच्या आठवड्यात नाशिकरोड (nashik road) भागात मोठी सभा झाली.

यावेळी बोलताना त्यांनी आता मी इकडे येत राहीन, तसेच महापालिकेवर भगवा फडकणार असे सांगितले. तर दुसरीकडे महाराष्ट्र निर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Maharashtra Nirman Sena youth leader Amit Thackeray) हेदेखील मागील दोन वर्षापासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत दोन्ही युवराज म्हणजेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विरुद्ध अमित ठाकरे (Amit Thackeray) असा सामना पाहायला मिळणार आहे.

2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. तर शहरातील चार पैकी तीन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) होते. असे असतानाही 2017 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होऊन फक्त पाच नगरसेवक 2017 साली निवडून आले. पाच वर्षाच्या काळात मनसेना प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी नाशिकचे विकासासाठी विशेष प्रयत्न केले. कोट्यावधी रुपयांची कामे देखील झाली. कुंभमेळा (Kumbh Mela) देखील यशस्वीरित्या झाला. तर शहरातील रिंग रोड तयार झाले.

कामे करताना योग्य नियोजन झाल्यामुळे भ्रष्टाचाराचा (Corruption) देखील आरोप झाला नाही. तरीही 2017 च्या निवडणुकीत मनसेनेने पाहिजेत तशी कामगिरी केली नाही. तर दुसरीकडे राज्यात शिवसेना-भाजपा सरकार होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते. त्यांनी नाशिकच्या प्रचार सभेत नाशिकला (nashik) दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय चित्र पालटले व तब्बलच्या 66 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्यामुळे गत पाच वर्षात नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) एक हाती सत्ता होती.

हाच धागा धरून आदित्य ठाकरे यांनी मागील दहा वर्षात नाशिक मध्ये विकास झाला नसल्याचे सांगत आता मी नाशिकला येत राहील व नाशिक महापालिका निवडणूक आपण जिंकू, मनपावर भगवा फडकणार असे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंट तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक घोषणेची आठवण करून देत, काय झाले याचे असा प्रश्न उपस्थित करून आता मी महापालिका निवडणुकीकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे नाशिक महापालिकेची सत्ता पुन्हा महाराष्ट्र निर्माण सेनेकडे यावी, यासाठी राज ठाकरे यांच्यासह युवा नेते अमित ठाकरे हे विशेष लक्ष देत आहे.

मागील दोन वर्षात अमित ठाकरे यांनी अनेक वेळा नाशिकमध्ये येऊन त्याबाबत नियोजन देखील केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन सुरु केले आहे. निवडणुकीत तरुणांना जास्त संधी देण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी काम केले आहे. शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा असतो असे राज ठाकरे नेहमी म्हणतात. म्हणून नाशिक शहरात 122 शाखाप्रमुख याची नेमणूक अमित ठाकरे यांनी केली.

यासाठी त्यांनी सुमारे 750 तरुणांची वन टू वन मुलाखत देखील पक्षाच्या कार्यालयात घेतली. अशा प्रकारे संघटन बांधणी बरोबरच महापालिका निवडणुकीची तयारी ठाकरे यांनी सुरू केली आहे. दोन महिन्यांपूर्वी अमित ठाकरे यांच्या नाशिक दौरा झाला आहे तर आता आदित्य ठाकरे यांनी देखील मी सतत येत राहील, असे सांगितल्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना पाहायला मिळणार आहे हे नक्की.

खा. राऊत यांच्यावर नाराज?

2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन राज्याची सत्ता आपल्या हातात घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यानंतर सेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत कमालीचे ॲक्टिव्ह झाले होते, व त्यांनी नाशिकला सतत येऊन आगामी महापौर शिवसेनेचाच होणार असे सांगत त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली होती. सेनेकडून दूर गेलेल्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांनी पुन्हा पक्षात आणून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कोर कमिटीची स्थापना केली होती. मात्र सहा महिन्यापूर्वी सेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले.

त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांची शिवसेनेत सतत प्रवेशाचा सिलसिला सुरू झाला. नाशिक मध्ये देखील शिवसेनेला अनेक धक्के बसत आहे. विशेष म्हणजे सेना सोडून जाणारे लोक थेट खा. राऊत यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत आता मी सतत येणार असे सांगत नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे ते राउतांवर नाराज आहे का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या