नाशिक पदवीधर निवडणुकीत आणखी एक ट्वीस्ट; ठाकरे गटाचा 'या' उमेदवाराला पाठिंबा

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency Election) महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु,डॉ. तांबेंनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. यानंतर सकाळपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. त्या बैठकीनंतर ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह नाशिकचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाटील यांना कोणत्याही पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. तर ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने त्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.

कोण आहेत शुभांगी पाटील?

शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले असून त्या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक देखील आहेत.

याशिवाय पाटील या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार असून नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या सचिव आहेत. तसेच शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com