शिंदे गटातील २२ आमदार नाराज; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

शिंदे गटातील २२ आमदार नाराज; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे (Shinde Group) २२ आमदार (MLA) नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात (BJP) विलीन करून घेतील. त्यानंतर शिंदेंचे काय होणार? एकनाथ शिंदे यांनी स्वत:बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माफ करणार नाही अशा शब्दात रोखठोकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने शिंदे गटावर टीका केली आहे....

ठाकरे गटाने म्हटले आहे की, मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत (Andheri East by-election) उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे.

याशिवाय शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा ते म्हणाले, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’’हे विधान बोलके असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे ( Maharashtra) मोठे नुकसान केले असून महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, 'शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या भूमिकेत असतील' असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही.

तसेच सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत' अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com