Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित

Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित

मुंबई | Mumbai

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) दोन्ही शिवसनेनेमध्ये (Shivsena) जोरदार संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सभा घेण्यासाठी कोणत्या गटाला परवानगी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर दावा करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतल्याने मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे गटाला या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे...

Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित
Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले

त्यानंतर आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दसरा मेळाव्याचा एक टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एक मैदान शिवतीर्थ असे म्हटले आहे. या टीझरमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असून आदित्य ठाकरे यांच्या हतात बाळासाहेब ठाकरे हे तलवार देतानाचा फोटो आहे.

Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून परवानगीसाठी महापालिकेला पत्र देण्यात आले होते. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेने आपले पत्र मागे घेतल्याने महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदान आणि क्रॉस मैदानाची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी कोणते मैदान मिळते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dasara Melava : "एक पक्ष, एक नेता..."; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित
ठरलं! यंदाही शिवतीर्थावर ठाकरेंचीच तोफ धडाडणार; दसरा मेळाव्यास परवानगी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com